OBC Reservation: अखेर राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केलाच, महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार निवडणुका;चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्ग आता महाविकास आघाडी सरकारवर नाराज झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आता ओबीसी जनता रस्त्यावर फिरू देणार नसून सरकारच्या या नाकर्तेपणामुळे ओबीसी वर्ग आंदोलनाने याला उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

OBC Reservation: अखेर राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केलाच, महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार निवडणुका;चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
अखेर राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केलाच, महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार निवडणुका;चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:49 PM

नागपूरः राज्य सरकारने पुन्हा ओबीसी (OBC) समाजाचा घात केला असून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन आठवड्यात निवडणुका जाहीर (Election announced) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या सरकारने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले असल्याचा ठपका चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठेवला आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान झाले असून याचे उत्तर जनताच सरकारला मिळणार आहे असेही मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सरकारने अडीच वर्षे टाईमपास

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, या सरकारने अडीच वर्षे टाईमपास केला आहे. राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाची ट्रीपलटेस्ट करत नाही, त्यासाठी संसाधनं पुरवत नाहीत, या कारणामुळेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही

न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत आज राज्य सरकारकडून वकील योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार हे हतबल असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूका लावल्या गेले असल्याचे त्यांनी सांगत या न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय झाला असल्याचे त्यांनी मत मांडले.

महाविकास आघाडीवर ओबीसी नाराज

न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्ग आता महाविकास आघाडी सरकारवर नाराज झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आता ओबीसी जनता रस्त्यावर फिरू देणार नसून सरकारच्या या नाकर्तेपणामुळे ओबीसी वर्ग आंदोलनाने याला उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारकडून ओबीसी वाऱ्यावर

या सरकारकडून ओबीसीना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. या सरकारकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणार नाही अशी घोषणा विधानमंडळात करण्यात आली होती, मात्र आज न्यायालयात सरकारकडून योग्य बाजू का मांडू शकले नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.