उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज

नव्याने उद्योजक म्हणून पुढे येत आपल्या स्वतःचा एक उद्योग, एक उपक्रम उभारायचे ज्या महिलांचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र शासन, अमेरिकन दूतावास आणि नावीन्यपूर्ण योजनांना मूर्त रूप देणाऱ्या एकाच स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत महिलांसाठी ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करून यामध्ये सहभागी होता येणार आहे.

उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:40 AM

नागपूर : कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या पुढाकाराने (Department of Employment Entrepreneurship) राज्यातील महिला उद्योजकांना (Women Entrepreneurs ) स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. यासाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अमेरिकी दुतावासाच्या देखील सहभाग आहे. तसेच अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अॅन्ड इनोवेशन रीसर्च (एसीआयआर) (Commercialization and Innovation Research) ही कंपनी उभारताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करणारी संस्था यामध्ये सहभागी आहे. उद्योगाचा विकास कसा करावा, तसेच स्टार्ट अप अर्थात नव्या उद्योजकाला वित्तपुरवठा कुठून मिळेल, गुंतवणूकदार कसे मिळतील आणि आपला उद्योग ग्राहकाभिमुख कसा होईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.

येथे साधावा संपर्क

महिला उद्योजकांनी http://www.mahawe.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी रुची सिंघानिया 7208257689 व अमित कोठावडे 9420608942 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या वेबसाईटवर एकदा अर्ज केल्यानंतर अर्ज शॉर्टलिस्ट अर्थात निवडल्या जाईल. योग्य अर्जदारांना आमंत्रित केल्या जाईल. महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार हे नावीण्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअपचे संस्थापक किंवा सह-संस्थापक असावेत, अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. सर्व वर्ग इंग्रजीमध्ये असल्याने सहभागींना इंग्रजीचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे भारतीय राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे. आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत.

महिला दिनी होणार प्रशिक्षणास सुरुवात

जागतिक महिला दिनाला अर्थात 8 मार्चला ऑनलाइन प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. नागपूर महानगर व जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. अर्ज व अन्य अडचणी संदर्भात कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाशी संपर्क साधता येईल. तथापि, यासंदर्भात उपलब्ध असणाऱ्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख

नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी फोडला बाँब, भाजपची सत्ता उलथविण्याचा प्लान सांगितला

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.