Nagpur Corona | धोका वाढला! आता विमानतळावरच होणार टेस्टिंग, नागपूर जिल्ह्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह

जे कोविड बाधित प्रवासी आहेत, त्यांचे येथेच निदान होईल. ते नागपूर शहरात प्रवेश करू शकणार नाही. यामुळे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करू. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून शहराला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही डॉ. राऊत म्हणाले.

Nagpur Corona | धोका वाढला! आता विमानतळावरच होणार टेस्टिंग, नागपूर जिल्ह्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात 210 जण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 9:48 AM

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीकडून विमानानं येणारे प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे विमानतळावर महापालिकेने टेस्टिंगची व्यवस्था केली. कोरोना शहरात पसरणार नाही आणि इथूनच नियंत्रणात येऊ शकेल. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं काम वाढवावं, अशा सूचना दिल्याचं नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री ( Guardian Minister) नितीन राऊत यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी ( Collector) आणि महापालिका (Municipal Corporation) आयुक्त यांच्याशी सुद्धा मी बोलणार असल्याचं ते म्हणाले. आता सध्या विजेची टंचाई नाही. वेळेच्या पूर्वीच इम्पोर्टेड कोळसा मिळविला. खाणीतील कोळसा सुद्धा थोडा थोडा मिळतो आहे. त्यामुळे आता सध्या वीज टंचाई नाही, असंही ते म्हणाले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपुरातही बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्यात दिल्लीहून येणार्‍या प्रवाशांपैकी कोविड बाधित येत असल्याचं लक्षात आलं.

कोविड बाधित प्रवासी

विमानतळावर पुन्हा कोविडची चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात येणार असल्याचं डॉ. नितीन राऊत म्हणाले. विमानतळावरही महापालिकेने कोविड चाचणीची व्यवस्था करावी. यामुळे जे कोविड बाधित प्रवासी आहेत, त्यांचे येथेच निदान होईल. ते नागपूर शहरात प्रवेश करू शकणार नाही. यामुळे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करू. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून शहराला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही डॉ. राऊत म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात 33 जण सक्रिय

सहा जून रोजी जिल्ह्यातून दोन रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. यात शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शहरात 181 व ग्रामीणमध्ये 40 अशा जिल्ह्यात 221 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहरातूनच तीन नव्या बाधितांची भर पडली. यादरम्यान एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत बाधितांची संख्या वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्याही वाढत आहे. सध्या शहरात 20, ग्रामीणमध्ये 12 आणि जिल्ह्याबाहेरील 1 असे 33 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी एकालाही लक्षणे नसल्याने ते सर्व गृहविलगीकरणात आहेत.

हे सुद्धा वाचा

महापालिकेच्या रुग्णालयात टेस्टिंग

महापालिकेच्या रुग्णालयात कुणी सर्दी खोकला, तापाचे रुग्ण गेले की, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं काळजी घ्यावी लागत आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....