माता न तू वैरीणी!, तरुण पोरींना अशा व्यवसायात ढकलले की कुणी कल्पनाही करू शकत नाही

पण, मुलींनी याला विरोध केला. प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महिलेच्या एजंट मित्राला अटक करण्यात आली. दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली.

माता न तू वैरीणी!, तरुण पोरींना अशा व्यवसायात ढकलले की कुणी कल्पनाही करू शकत नाही
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 2:01 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : नागपुरात एक दुर्दैवी घटना समोर आली. एक महिला पैशाच्या आमिषाला बळी पडत देहव्यापारात गेली. तिला पैसे मिळू लागले. त्यामुळे १५ आणि १६ वर्षांच्या दोन्ही मुलींनी या व्यवसायात यावे, असे तिला वाटायला लागले. तिने तसा प्रयत्न केला. तिच्या मित्राने या दोन्ही मुलींना देहव्यापारत ओढण्याचा प्रयत्न केला. पण, मुलींनी याला विरोध केला. प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महिलेच्या एजंट मित्राला अटक करण्यात आली. दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली.

टोनी नावाच्या आरोपीला अटक

आई आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी कुठल्या स्तराला जाऊ शकते, असं म्हटलं जातं. मात्र नागपुरात एक आईच स्वतःच्या मुलींची वैरीण ठरली. या आईने आपल्या दोन्ही मुलींना देह व्यापारात ढकलण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी टोनी नावाच्या एका आरोपीला अटक केली. दोन्ही मुलींची त्याच्या घरातून सुटका केली.

हे सुद्धा वाचा

गरिबीमध्ये दिवस काढणारी एक महिला एका मैत्रिणीला भेटली. तिच्यासोबत तिचा मित्रसुद्धा होता. मैत्रीण आणि तिच्या मित्राने त्या महिलेला तिच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला. जास्त पैसे मिळवण्यासाठी तिला देहव्यापार करण्याचा सल्ला दिला. त्यातून तिला पैसे मिळू लागले. तिने स्वतः तर देह व्यापार केलाच.

मुलींचा विरोध

मात्र तिला 15 आणि 16 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्या मुलींनासुद्धा यामध्ये ओढले तर आणखी पैसे मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. टोनीने त्यांना सुद्धा या व्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला. मुलींनी यासाठी नकार दिला. मात्र तिच्या आईने या मुलींना या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्या प्रकाराची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टोनीच्या घरी छापा टाकत कारवाई केली. टोनीला अटक करून दोन मुलींची सुटका केली. मात्र टोनीची मैत्रीण आणि मुलीची आई या दोघेही गोव्याला आहेत. या मुलींनासुद्धा गोव्याला नेण्याची तयारी होती.

टोनीची मैत्रीण आणि मुलीच्या आईला पोलीस अटक करण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक यांनी दिली. एका आईची ही कृती नात्याला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.