Nagpur NMC | नव्या सीमांमुळे अनेक उभेच्छुकांचा हिरमोड; मनपा आयुक्त म्हणतात, आक्षेप, सूचना मागविल्या

आता पक्षाकडून ठरविण्यात येणारे उमेदवार अथवा इच्छुक आता खर्‍या अर्थाने निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. महापालिका निवडणूक 2022 च्या प्रभाग रचना, आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त (Municipal Commissioner) राधाकृष्णन बी यांनी दिलीय.

Nagpur NMC | नव्या सीमांमुळे अनेक उभेच्छुकांचा हिरमोड; मनपा आयुक्त म्हणतात, आक्षेप, सूचना मागविल्या
नागपूर महापालिकेसमोर लावण्यात आलेले प्रभाग रचनेचे फलक.
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:06 AM

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांचे लक्ष हे प्रभाग रचनेकडे लागले होते. ही उत्सुकता आता संपली. राज्य निवडणूक आयोगाकडून नव्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा (Draft plan of ward structure) प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता पक्षाकडून ठरविण्यात येणारे उमेदवार अथवा इच्छुक आता खर्‍या अर्थाने निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. महापालिका निवडणूक 2022 च्या प्रभाग रचना, आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त (Municipal Commissioner) राधाकृष्णन बी यांनी दिलीय. सुनावणीच्या तारखांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. यानुसार निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. नागपूर मनपाच्या बाहेर प्रभाग प्रारुप प्रसिद्ध करण्यात आलंय. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. शहरात एकूण 52 प्रभाग आहेत. त्यात 156 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 26 प्रभागांमध्ये एक पुरुष आणि दोन महिला सदस्यांसाठी जागा आरक्षित राहील. 78 जागा महिलांसाठी आरक्षित राहतील.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

मंगळवारी महापालिकेच्या आवारात फ्लेक्सवर सर्वच 52 प्रभागाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग प्रारूप अधिसूचनेवर हरकती आणि सूचना मागविण्यात येतील. 16 फेब्रुवारीला प्राप्त हरकती आणि सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल.

काही नगरसेवकांची आक्षेप नोंदविण्याची तयारी

नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नगरसेवकांच्या सध्याचा प्रभागांचे विभाजन, त्रिभाजन झाले आहे. जुने प्रभाग काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रभागात विभागले गेलेत. यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्याही अपेक्षेवर पाणी फेरले गेले. या फेरबदलामुळे अनेक नगरसेवकांनी नाराजीचा सूर लावला. काहींनी आक्षेप नोंदविण्याची तयारी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा जाहीर करणे, आक्षेप, हरकती, सूचना मागविणे तसेच सुनावणी घेणे आदी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.