Video Sanjay Raut | नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचा असेल, संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये फुंकले प्राण

नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात उतरणार. मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे. जे नागपूरकर म्हणतात, ते आता मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या प्रॉपर्टी मुंबईत आहे. नागपूरला वाऱ्यावर सोडलं.

Video Sanjay Raut | नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचा असेल, संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये फुंकले प्राण
शिवसेना नेते संजय राऊतImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:34 AM

नागपूर : शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. त्यांना आता पुढील 25 वर्षे विरोधी पक्षातच राहायचं आहे. त्यामुळे आतापासून नागपूर महापालिकेची (Nagpur Municipal Corporation) तयारी करा, घरा घरात पोहचा आणि सांगा यापुढचा नागपूरचा महापौर (Mayor of Nagpur) शिवसेनेचाच असेल. असा हुंकार नागपुरात शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. ते दक्षिण नागपूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात (Karyakarta Melawa) बोलत होते. राऊत म्हणाले, आता इथल्या थापा खूप झाल्या. आता फसवणूक होऊ देणार नाही. महिला आघाडीला रणरागिणी म्हणतात. त्या आता नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात उतरणार. मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे. जे नागपूरकर म्हणतात, ते आता मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या प्रॉपर्टी मुंबईत आहे. नागपूरला वाऱ्यावर सोडलं.

मनपात शिवसेनेचे वाघ येणार

राऊत म्हणाले, आता यांच्यावर इडी लागायला पाहिजे. आमच्यावर इडी लावतात, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. महापालिकेच्या घोटाळ्यावरून अनेकजण जेलमध्ये जातील. शिवसेना बेडर संघटन आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही. कोणाच्या पाठीमागून वार करत नाही. नागपूर महापालिकेवर भगवा फडकेलं. तेव्हा बाळासाहेब वरून पुष्पवृष्टी करतील. आजही नागपुरात कोण आला रे कोण आला ही गर्जना घुमते. नागपूर महापालिकेत शिवसेनेचे वाघ येणार आहे. कारण नागपुरातील लोकांचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार फोफावत आहे. भोंगे राजकारण चालू आहे. स्वतःची माणस नाहीत. म्हणून भाड्याचे लोक घेतात. आता भोंगे लावणार आणि महागाईवर बोलणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. नागपुरात 572 लेआऊट अविकसित आहेत. नागपूर महापालिकेत फक्त 25 वाघ पाठवा. तेच यांचा नरडा दाबतील. वाघ फक्त शिवसेनेचा असतो भाजपचा नाही, असंही त्यांनी दामटून सांगितलं.

नागपुरात राहून सुबुद्धी आली नाही

संजय राऊत म्हणाले, ते दंगली घडवितात. हे कसे पळून जातात, आम्ही बघीतलं आहे. अयोध्येत मस्जिद पाडण्यात शिवसेनेचे वाघ होते. हे बाळासाहेबांनी सांगितलं. नागपूरच्या विमानतळावर उतरलो. आणि सरळ इकडे आलो. हल्ली नागपूरचे लोक मुंबईत राहतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूरची माती अशी आहे की सुबुद्धी मिळते खरं आहे. पण नागपुरात राहून तुम्हाला सुबुद्धी आली नाही. म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं. शिवसेनेसोबत होते. सत्तेत होते. मात्र तसं झालं नाही. वीट यावं अशा काही गोष्टी नागपुरातून घडतात, असंही त्यांनी सांगितलं.

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना

Saamana : मास्क पुन्हा अनिवार्य होणार! शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेत

power outage : विजेची उधळपट्टी होऊ नको, वापराबाबत सर्वांनी काळजी घ्या: मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.