Amravati Crime | नववधूला फरफटत नेणारे आईवडील हरले; अमरावतीतील मुलगी नवऱ्याकडे जाणार

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. काल रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी या मुलीचे इन कॅमेरा बयान होणार असल्याचं मोर्शीचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी सांगितलं.

Amravati Crime | नववधूला फरफटत नेणारे आईवडील हरले; अमरावतीतील मुलगी नवऱ्याकडे जाणार
मोर्शी पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 4:27 PM

अमरावती : मुलीने आंतर जातीय प्रेमविवाह केल्याने आईवडील चिडले. त्यांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण करत फरपटत नेले. ही घटना अमरावती जिल्ह्यातील अंबाडा (Ambada) या गावात घडली. सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील प्रतीक तडस (Prateek Tadas) या युवकाशी प्रेम संबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी चार मे रोजी घरून मुलाकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजले. मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले. त्यांनी मुलीला फरपटत, मारहाण करत उचलून नेले. प्रतीकने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची मोर्शी पोलीस (Morshi Police) ठाण्यात तक्रार केली. मात्र गेले तीन दिवसांत पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना जाग

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. काल रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी या मुलीचे इन कॅमेरा बयान होणार असल्याचं मोर्शीचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी सांगितलं. प्रेम विवाह करणारे तरूण-तरुणी आता पुन्हा एकत्र येणार आहेत. अंबाडा या गावातील एका 22 वर्षाच्या तरुणाचे परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमातूनच दोघांनी एकत्र येऊन आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध आहे. अशातच 28 एप्रिलला या तरुणाने आणि तरुणीने अमरावतीमधील आर्य समाजात प्रेम विवाह केला. त्यानंतर दोघेही आपल्या अंबाडा येथे घरी सुखाने नांदत होते.

मुलगी सज्ञान असल्याने मुलाकडे जाणार

आपल्या मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केला, ही गोष्ट तिच्या घरच्यांना मान्य नव्हती. म्हणूनच चार तारखेला मुलीचे आई-वडील व त्यांचे नातेवाईक हे मुलाच्या घरी आले. काही वेळ चर्चा केल्यानंतर अचानक मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला मारहाण केली. जबरदस्तीने तिला फरफटत नेत घरी नेल्याचा आरोप मुलाने केला होता. शेवटी पोलिसांनी मुलीचे बयाण घेतले. ती मुलगी सज्ञान आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. त्यामुळं पोलिसांनी तिला तिच्या प्रियकरासोबत सोपविले. आर्य समाजाच्या पद्धतीने त्यांचे लग्नसुद्धा झाले आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.