Nagpur Crime | एमपीतील भामट्यांनी नागपुरातील डॉक्टरला गंडवले; स्वस्तात कार खरेदी करून देण्याचा बहाना

स्वस्तात नवीन लक्झरी कार देण्याच्या बहाना केला. मध्य प्रदेशातील एका ठगाने नागपुरातील एका डॉक्टरला 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉक्टरनं अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

Nagpur Crime | एमपीतील भामट्यांनी नागपुरातील डॉक्टरला गंडवले; स्वस्तात कार खरेदी करून देण्याचा बहाना
एमपीतील भामट्यांनी नागपुरातील डॉक्टरला गंडवलेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 2:40 PM

नागपूर : नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील (Super Specialty Hospital) डॉक्टरला मध्यप्रदेशातील भामट्यांनी स्वस्तात नवीन लक्झरी कार मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेश राज्यात परिवहन कर (Transport Tax) कमी आहे. तिथून कार खरेदी केल्यास किमान दोन लाखांची बचत होईल, अशी बतावणी करून आरोपींनी डॉक्टरची फसवणूक केली आहे. या प्रकरणातील डॉक्टर धनंजय सेलूकर (Dr. Dhananjay Selukar) हे स्पेशालिटी रुग्णालयात युरोलॉजी विभाग प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची आयूष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल यांच्यासोबत भेट झाली होती. यावेळी डॉक्टर सेलूकर यांनी नवीन कार घेणार असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा अग्रवाल यांनी महाराष्ट्राऐवजी मध्यप्रदेशमधून कार घेतल्यास आरटीओ नोंदणी कर किमान दोन ते तीन लाख रुपयांनी कमी लागेल, असे सांगितले.

तरुणाला दिले 11 लाख शोरूममध्ये फक्त 50 हजार

डॉक्टर धनंजय सेलूकर यांनी मध्यप्रदेशमधून कार विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यांनी कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले. मात्र,आरोपींनी केवळ 50 हजार रुपयेचं कार शो-रूममध्ये भरून उर्वरित रक्कम लंपास केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांनी थेट अजनी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या आरोपीं विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती अजनीचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली.

फसवणूक झाल्यानंतर तक्रार

स्वस्तात नवीन लक्झरी कार देण्याच्या बहाना केला. मध्य प्रदेशातील एका ठगाने नागपुरातील एका डॉक्टरला 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉक्टरनं अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये बुकिंग अमाउंट जमा केली. त्यानंतर लवकर कारची डिलिव्हरी मिळेल अशी अपेक्षा डॉक्टरला होती. मात्र, कार मिळण्यास उशीर होत आल्याने त्यांनी कार शोरूममध्ये चौकशी केली. तेव्हा केवळ 50 हजार रुपयेचं बुकिंग अमाउंट जमा झाले असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचं समजलं. त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना सावधता बाळगणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...