Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

नागपुरात रस्त्याच्या कडेला तर्रीबाज पोहेवाला म्हणून प्रसिद्ध मिळविणारे रूपम साखरे यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी आपला देह सोडला. तर्रीबाज पोहे तयार करणारे रूपम आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळं अशी खासीयत असणारे पोहे आता नागपूरकरांना खायला मिळणार नाहीत.

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन
तर्री पोहेवाले रूपम साखरे यांचा संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 12:11 PM

नागपूर : मोहननगरातील रूपम साखरे (Roopam Sakhare) यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. किलोभर पोहे घेऊन कस्तुरचंद पार्क परिसरातील फुटपाथवर पोहे (Tarri Pohe) विकण्याचा व्यवसाय सुरू केला. याच फुटपाथवर साखरे यांना जगण्याचे अर्थशास्त्र सापडले. पुढे केपी की पोहा टपरी अशी त्यांची ओळख झाली. पाहता पाहता व्यवसाय तेजीत आला. बारा तासांमध्ये नव्वद किलोंपेक्षा अधिक पोहे तयार केला. त्याचा विक्रम रूपम यांच्या नावावर आहे. रूपम यांनी तयार केलेले पोहे ही नागपूरची ओळख बनली. ते चर्चेत आले ते दरवर्षी कुटुंबाला घेऊन नव्या देशात विदेशवारी करतात म्हणून. दरवर्षी रूपम प्राप्तीकरही भरत होते. श्रीमंतीचा कधी आव आणला नाही. दुकानात आल्यानंतर खाकी कपडे परिधान कत. हातात सराटा घेऊन कढईत पोहे तयार करीत. पोहे तयार झाले रे झाले की, खवय्यांची गर्दी होत असे. दुचाकी नव्हे तर फोर व्हीलरवालेही रूपम यांच्या हातचे तर्री पोहे खाण्यासाठी येत असतं. स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला.

पोहे, तर्री, त्यावर अर्धा टमाटर

रूपम साखरे यांनी तयार केलेले पाहे देशाविदेशातही पोहचले. विदेशी लोकही हातात प्लेट घेऊन त्यांच्या हाताने तयार केलेले तर्री पोहे खात. पोहे, त्यावर तर्री आणि वर अर्धा टमाटर ही रूपम यांच्या पोह्यांचे खास वैशिष्ट्ये होते. सुमारे 45 वर्षे कस्तुरचंद पार्क येथे पोहे विक्रीचा व्यवसाय त्यांनी केला. रूपम दररोज सकाळी होंडा सिटी कारमधून घराबाहेर पडत. भाजीपाला विकत घेण्यासाठी भाजी मंडईत जातं. त्याच गाडीत पोह्याचे पोते आणत होते. दिवसभर प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटांना त्यांना कढईभर पोहे तयार करावे लागत होते. त्यांच्या निधनाने नागपूरकरांना पोहे खिलविणारा उदार माणूस आता परत येणार नाही. रूपम साखरे हे चना, मसालेदार रस्सा पोह्याबरोबर द्यायचे. हा टपरीवरचा पोहेवाला टॅक्स पेअर होता. या व्यवसायाने सुबत्ता आली. चांगले दिवस त्यांना बघायला मिळाले होते. आता त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पण, रूपम यांच्या हातच्या पोह्यांची चव जरा हटके होती. त्यामुळं आता ती चव चाखणाऱ्यांना रूपम साखरे यांची नक्कीच आठवण येईल.

cold wave | विदर्भात पाऊस, गारपीट आणि नुकसान; थंडीची लाट आजही कायम?

Bhandara Yatra | कुंभलीतील दुर्गाबाईची यात्रा रद्द; तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काय पाठविला प्रस्ताव?

Nagpur ZP | आरोग्य कर्मचारी नाही हे तर लोकसेवक; जि. प. सीईओंनी शोधलेले रोल मॉडल काय?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...