मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार, 27 टक्के आरक्षणासाठी केंद्राशी संघर्ष करणार
पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदारवर राहण्यात उपयोग काय? असा उद्विग्न सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. (babanrao taywade)
नागपूर: पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदारवर राहण्यात उपयोग काय? असा उद्विग्न सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याचं तायवाडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Then i will resigned as a member of state obc commission says babanrao taywade)
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही घोषणा केली. या पदावर राहून माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर मी या पदावर राहण्यास योग्य नाही. म्हणून मी येत्या 1 ते 2 दिवसात या पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलो आहे. तत्वांशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे उद्या संध्याकाळीच मी राज्यपालांना राजीनामा पाठवणार आहे, असं तायवाडे यांनी सांगितलं.
सरकार आरक्षण अबाधित ठेवू शकत नाही
यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. सध्या संपूर्ण राज्याचा ओबीसींचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे. राज्य शासन ओबीसींचे 27 टक्के आरक्षण अबाधित ठेऊ शकत नाही, असं मत तायवाडे यांनी व्यक्त केलं. तसेच ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणासाठी केंद्र सरकारशी संघर्ष करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निवडणुका लागल्यानंतर तायवाडे बोलले
राज्यातील पाचही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असल्याने ओबीसी समाजाचं मोठं राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तायवाडे यांनी हे विधान केल्याने त्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. तायवाडे यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
भाजप आंदोलन आणि तायवाडे
भाजपने आजच राज्यात एक हजार ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी आणि सरकारचा निषेध म्हणून जोरदार आंदोलन छेडलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचवेळी तायवाडे यांनी राजीनामा देण्याचं सुतोवाच केल्याने ठाकरे सरकार अधिकच अडचणीत सापडले आहे. तायवाडे यांनी राजीनामा दिल्यास ओबीसी आरक्षणाला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे संकेत जाऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीत ठाकरे सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
कोण आहेत बबनराव तायवडे?
>> ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष >> त्यांनी धनवटे नेशनल कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून काम बघितलं >> काँग्रेस च्या तिकिटावर 2013 मशे त्यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली >> तायवाडे कॉलेज नावाने त्यांचं कॉलेज आहे >> काँग्रेस नेते , आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे >> नागपूर विद्यापीठ सिनेट मेम्बर म्हणून काम पाहिलं
आयोगातील सदस्यांची नावे
प्राचार्य बबनराव तायवडे अॅड. चंद्रलाल मेश्राम (माजी न्यायमूर्ती) अॅड. बालाची किल्लारीकर प्रा. संजीव सोनावणे डॉ. गजानन खराटे डॉ. निलीमा सराप (लखाडे) प्रा. डॉ. गोविंद काळे प्रा. लक्ष्मण हाके ज्योतीराम माना चव्हाण (Then i will resigned as a member of state obc commission says babanrao taywade)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 15 September 2021 https://t.co/JEwzAdQ0pt #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?
‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
(Then i will resigned as a member of state obc commission says babanrao taywade)