Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती
सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई राहणार नाही. राज्यातील धरणांमध्ये 82.33 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा राहणार आहे. त्यामुळं पाण्याची चिंता नाही.
नागपूर : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 80.33 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळं यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या एकूण धरणांमध्ये सरासरी 82.33 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये नऊ टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
विदर्भ विभागात 80 टक्के पाणीसाठा
अमरावती विभागात धरणांमध्ये 81.13 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तो 71.17 टक्के होता. नागपूर विभागात 77.44 टक्के पाणीसाठी आहे. गेल्या वर्षी तो 66.63 टक्के होता. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 82.33 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा उन्हाळ्यातंही पाण्याची चिंता नाही. नाशिक विभागात पाणीसाठा 83.78 टक्के होता. गेल्या वर्षी तो 78.7 टक्के होता. पुणे विभागात पाणीसाठा 83.31 टक्के होता. गेल्या वर्षी तो 76.89 टक्के होता. राज्यात एकूण पाणीसाठा 82.33 टक्के आहे.
औरंगाबाद विभागात 83.91 टक्के पाणीसाठा
औरंगाबाद विभागात 83.91 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो 73.57 टक्के होता. कोकण विभागात 80.8 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो 71.79 टक्के होता. दरवर्षी उन्हाळा आला की, पाणीटंचाईचा प्रश्न पडतो. पण, गेल्या वर्षी धरण भरले होते. यंदाही अशीच परिस्थिती आहे. याचा कारणही तसेच आहे. कोरोनामुळं उद्योगधंदे बंद होते. त्यामुळं पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाला. शिवाय लोकं घराबाहेर कमी पडले. त्याचाही परिणाम पाणीसाठ्यावर झाला. पाण्याचा वापर कमी झाल्यामुळं धरणांतील पाणीसाठी कमी खर्च झाला. त्यामुळं यंदा धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठी आहे.