Nagpur Crime | नागपुरात चोरांचा सुळसुळाट; एकीकडे गर्मीने तर, दुसरीकडं चोरीच्या घटनांनी नागरिक परेशान
नागपुरात 14 वर्षापासून घरात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. जरीपटका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर दुसरीकडं एकाच दिवशी तीन ठिकाणी लगातार चोरीच्या घटना घडल्या. यामुळे शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला की काय असे प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर : एकाच दिवशी तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या चोरीच्या घटना घडल्या. पहिली घटना जरीपटका पोलीस स्टेशन (Jaripatka Police Station) हद्दीत घडली. 14 वर्षांपासून मालकाच्या घरात घर काम करणाऱ्या नोकरांनी मालक घराबाहेर गावी गेल्याची संधी साधत चोरीचा कट रचला. घरात चोरी झाल्याचं मालकाला फोन करून सांगितलं. मात्र पोलिसांनी तपास करायला सुरवात करताच हळूहळू दोन्ही नोकर पोलिसांच्या घेऱ्यात आले. पोलिसांनी झटका दाखवताच आपणच चोरी केल्याची कबुली दिली. बिहारमधून आलेल्या एक तर दुसरा नोकर भंडारा जिल्ह्यातील आहे. कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली (Confession of Theft) आरोपीने दिली. अशी माहिती जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार (Police Inspector Gorakh Kumbhar) यांनी दिली.
तर विश्वास कोणावर ठेवायचा…
घरात नोकर ठेवत असताना त्याची पूर्ण माहिती घ्या, असं पोलीस नेहमी सांगत असतात. मात्र गेल्या 14 वर्षांपासून एखादी नोकर घरात काम करत असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला असतो. मात्र तोच नोकर असे कृत्य करत असेल तर मग विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित होतो.
चोरीच्या घटनांचा सुळसुळाट
नागपुरात 14 वर्षापासून घरात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. जरीपटका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर दुसरीकडं एकाच दिवशी तीन ठिकाणी लगातार चोरीच्या घटना घडल्या. यामुळे शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला की काय असे प्रश्न उपस्थित होत आहे. मुलांना शैक्षिणीक साहित्य देण्यात निर्धार ‘द डिवाईन ग्रुप‘ व जेसीआय नागपूर सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी जेसीआय नागपूर अध्यक्ष प्रिया आचार्य, सचिव आदिती पाॅल, श्रीरंग नेने, अनुज माथूर, मयुरी मेहेरे, दत्ता सुरर्वसे, कमलेश सिरसीकर, ‘द डिवाईन ग्रुप‘चे पीयूष कांबळे, अक्षय वनकर, आदिंची उपस्थिती होती.