Nagpur Ganesh : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, परवानगीसाठी एक खिडकीची व्यवस्था, नागपूर मनपा आयुक्तांची माहिती

सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. मनपातर्फे पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येईल.

Nagpur Ganesh : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, परवानगीसाठी एक खिडकीची व्यवस्था, नागपूर मनपा आयुक्तांची माहिती
नागपूर मनपा आयुक्तांची माहिती
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:11 AM

नागपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्व प्रकारची परवानगी देण्याकरिता नागपूर महानगरपालिकातर्फे एक खिडकीची व्यवस्था करण्यात येईल. असे आश्वासन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांनी दिले आहे. यंदा साजरा होणारा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असला तरी नागरिकांनी जबाबदारीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. नागपूर महापालिकेतर्फे रघुजी राजे भोसले नगर भवन (टाउन हॉल) महाल (Mahal) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक (Meeting of Public Boards) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस उपायुक्त वसवराज तेली, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हरीश राऊत, अशोक पाटील, गणेश राठोड, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छ असोसिएशनच्या श्रीमती अनुसया काळे छाबरानी आदी उपस्थित होते.

काही तलावांवर विसर्जनाची बंदी

मनपा आयुक्तांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, सध्या नागपुरात गांधीसागर तलाव आणि सोनेगाव तलावात सौदर्यींकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. तसेच फुटाळा तलावात मोठे फाऊंटन लावले असल्याने, यंदा चार फुटाच्या वर उंची असलेले गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात करता येणार नाही. फुटाळा तलावात चार फुटाच्यावर गणेश मूर्ती विसर्जनाची परवानगी कुठल्याही मंडळाला मिळणार नाही. त्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये मागच्या काही वर्षांपासून तलावात विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. याचा चांगला परिणाम दिसायला मिळत आहे.

निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था

नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सर्व परवानगी देण्यासाठी एक खिडकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकारसुद्धा दिले जातील. तसेच मोकाट जनावरापासून होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी मोकाट जनावरे कोंडवाड्यात पाठविण्यात येतील. संबधित जनावरांच्या मालकांवर मोठा दंड आकारण्यात येईल. त्यांनी सांगितले की, कृत्रिम विसर्जन टॅंकची संख्या यंदा दुप्पट करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. तसेच चार फुटापेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन नागपूरच्या बाहेर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्या ठिकाणी मनपातर्फे क्रेन आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल. तसेच निर्माल्य संकलनासाठी मोठे कलश लावण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.