Nagpur Yoga | यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन कस्तुरचंद पार्कवर, देशातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये नागपूरची निवड

21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. यावर्षी योग दिवसासाठी योगा फार ह्युमॅनिटी ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी सात पूर्वी पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Nagpur Yoga | यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन कस्तुरचंद पार्कवर, देशातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये नागपूरची निवड
यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन कस्तुरचंद पार्कवर
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:35 PM

नागपूर : योग बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान आहे. प्राचीन भारतीय योग चिकित्सेला ( Indian Yoga Medicine) संपूर्ण जगाने स्वीकारलंय. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे. नागपूर शहरात कस्तुरचंद पार्कवर ( Kasturchand Park) यानिमित्ताने मोठा कार्यक्रम होणार आहे. 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत आहे. आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या झिरो माईल्सच्या (Zero Miles) नागपूरचीही निवड झाली आहे. देशभरात आयुष मंत्रालयामार्फत 75 प्रसिद्ध स्थळांवर योग दिन आयोजित करण्यात येणार आहे.

नागरिकांनाही होता येणार सहभागी

केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत आहे. नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं यासाठी पुढाकार घेतला. हा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या योग दिनाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचा सहभाग राहणार आहे. शिवाय एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्था, नेहरू युवा केंद्र व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाही सहभागी होणार आहे. सामान्य नागरिकांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.

योगा फार ह्युमॅनिटी

21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. यावर्षी योग दिवसासाठी योगा फार ह्युमॅनिटी ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी सात पूर्वी पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. योग दिनाचं निमित्त साधून हे आयोजन करण्यात आलं. देशातील 75 ठिकाणांमध्ये नागपूरचा सहभाग राहणार आहे. त्यामुळं नागपूरकरांना या कार्यक्रमात हजेरी लावता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.