नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा थरार पाहता येणार! क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा ( Aero Modeling Show) थरार पाहता येणार आहे. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार (Sports Minister Sunil Kedar) यांनी ही माहिती दिली. नागपुरातील मैदानात मानव विरहित विमाने उडविण्यात येणार आहेत. याचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा थरार पाहता येणार! क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती
बैठकीत माहिती देताना क्रीडामंत्री सुनील केदार.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 11:24 AM

नागपूर : राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शोचे ( Aero Modeling Show) आयोजन करण्यात आले आहे. या शोमुळे विद्यार्थ्यांना या शोचा थरार थेट पाहायला मिळणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sports Minister Sunil Kedar) यांनी ही माहिती दिली. मुंबई येथे मंत्रालयात एरो मॉडेलिंग शो विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस क्रीडा विभागाचे आयुक्त प्रकाश बकोरिया (Commissioner Prakash Bakoria) हे दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. कर्नल अमित बाली, ब्रिगेडीअर लाहिरी, कॅप्टन सतपाल सिंग यांची उपस्थिती होती. श्री. केदार म्हणाले, आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराचे विमाने (मानव विरहीत) उडविण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार सैन्यदलाची माहिती

हा शो पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हा शो क्रीडा विभाग, एनसीसी आणि सैन्य दल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विद्यार्थ्यांना एरो मॉडलिंग विषयी माहिती होऊन त्याबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशा उपक्रमामुळे सैन्यदलाविषयी, विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बांधवांसाठी महाशरद पोर्टल

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग महामंडळाकडून दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाजसेवक व दानशूर यांनी थेट दिव्यांग बांधवास आर्थिक मदत व त्यांना आवश्यक असणारे सहाय्यक उपकरणे दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी महाशरद पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पोर्टलवर राज्यातील विविध भागातून दिव्यांग व्यक्ती नोंदणी करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गुगल पेजवरुन http://maharasharadportal असे टाईप करून पुढे गेल्यास दिव्यांग व्यक्तीस नोंदणी करण्याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी महाशरद पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे.

नागपूर कारागृहातील झडतीत गुंडाकडे सापडल्या होत्या तार, टॅबलेट्स; जेलरने खरटपट्टी काढल्याने चिडून केला हल्ला

उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज

पर्यटनाला केव्हा येणार चांगले दिवस?, नागपुरातील पर्यटकांचे जंगल सफारीला प्राधान्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.