Campaign | क्षयरोग दुरीकरण मोहीम, गुंतवणूक करा व जीव वाचवा; 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त?

क्षयरोग दुरीकरण अभियान यशस्वी कारणासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाची मुख्य थीम टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा (Invest to End TB save lives) ही आहे.

Campaign | क्षयरोग दुरीकरण मोहीम, गुंतवणूक करा व जीव वाचवा; 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त?
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 6:00 AM

नागपूर : वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार (Dr. Narendra Bahirwar) म्हणाले, भारतात क्षयरोग दुरीकरण मोहिमेला (Tuberculosis Eradication Campaign in India) 60 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. 2025 पर्यंत भारतातून क्षयरोग दूर करावयाचा आहे. हे दुरीकरण अभियान यशस्वी कारणासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. क्षयरोग जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाची मुख्य थीम टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा (Invest to End TB save lives) ही आहे. यावेळी डॉ. बहिरवार यांनी Invest चा अर्थ समजावून सांगितलं. I – Invest, N – Notification, V – Valufication, E – Energy, S – Sincerely आणि T – Time. या थीम प्रमाणे आपण जर आपल्या जीवनात बदल केला तर नक्कीच 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य चमूने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी डॉ. बहिरवार यांनी केले.

क्षयरोग झाला म्हणजे आयुष्य संपत नाही

क्षयरोग आजार झाला आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येत नाही. आजार वाढल्यानंतर जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा क्षयरोगाचे निदान होते. मात्र निदान झाल्यानंतर रुग्ण बिमारी पेक्षा भीतीनेच जास्त खचून जातो. अशा वेळी रुग्णाला गरज असते मानसिक आधाराची. एकदा क्षयरोगाचे निदान झाले की ते योग्य उपचाराने बरे होते. त्यामुळे क्षयरोग झाले म्हणजे आयुष्य संपले, असा विचार कुणीही मनात आणू नये, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मेयोचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. राजेश बल्लाळ, डॉ. सय्यद तारिक, डॉ. झारीया, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी मनपा, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. महेश्वर, डॉ. सदफ खतिब व सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले. यावेळी क्षयरोग दुरीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी डॉक्टर्स, अशा वर्कर्स, खासगी स्तरावरील केमिस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर

Maharashtra News Live Update : केंद्रानं दिलेली व्हेंटिलेटर चालली नाहीत, त्याची टेंडर काढलेली का? : उद्धव ठाकरे

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.