Video Nagpur Fire | नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटली; महाकाली चौकात धुराचे लोळ
नागपुरातील महाकाली चौकात आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीत एक दुचाकी जळून खाक झाली. दुपारची वेळ असल्यानं ही मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलंय.
नागपूर : नागपूरच्या महाकाली चौकात (In Mahakali Chowk) भर दुपारी दुचाकीने पेट घेतला. ही दुचाकी पार्किंगमध्ये उभी होती. बघता बघता आगीने दुचाकीला क्षणार्धात राख करून टाकलं. दीपक खेडकर (Deepak Khedkar) यांच्या घरासमोर ही प्लेझर (Pleasure) दुचाकी पार्क केली होती. आग कश्यामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे. वाढत्या गर्मीने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याने आग नियंत्रणात आली. आजूबाजूला पार्क असलेल्या दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचविण्यात नागरिकांना यश आलंय.
बाईक सेंटरसमोरील घटना
दुपारी एक वाजताची गोष्ट. मानेवाडा रिंग रोड येथील महाकाली नगर चौकात काही दुचाकी ठेवल्या होत्या. नीलेश बाईक सेंटरसमोरील उभ्या असलेल्या एका बाईकला आग लागली. दुपारची वेळ असल्यानं ही आग मोठी होती. गाडीने पेट घेतला. आगीने विक्राळ रूप धारण केले. बघ्यांची गर्दी जमा झाली. काहींनी फोटो, तर काहींनी याचे व्हिडीओ चित्रित केले.
पाहा व्हिडीओ
नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटल्याने महाकाली चौकात धुराचे लोळ pic.twitter.com/KlztafDQCb
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 20, 2022
आग विझविण्याचा प्रयत्न
नागपुरातील महाकाली चौकात आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीत एक दुचाकी जळून खाक झाली. दुपारची वेळ असल्यानं ही मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलंय. आग लागल्याचे लक्षात येताच छोटे अग्निशमन यंत्र मागविण्यात आले. दोघांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत प्लेझर गाडी जळून खाक झाली होती. पण, बाजूच्या गाड्या जळण्याचा धोका होता. लवकर आग आटोक्यात आल्यानं बाजूच्या गाड्या पेट घेण्यापासून बचावल्या.