भाषण सुरु होताच सभागृहात गोंधळ, उद्धव ठाकरे संतापले, म्हणाले, “माझ्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये…”

ठाकरे गटाच्या नागपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात आज एक अनपेक्षित घटना घडली. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झाल्यानंतर अचानक सभागृहात गोंधळ सुरु झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड कडक शब्दांमध्ये बरसले.

भाषण सुरु होताच सभागृहात गोंधळ, उद्धव ठाकरे संतापले, म्हणाले, माझ्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये...
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 7:42 PM

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात सभा पार पडली. पण या बैठकीत एक अनपेक्षित घटना घडली. ठाकरे गटाचा नागपुरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु झाल्यानंतर अचानक गोंधळ उडाला. त्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमकपणे म्हणाले की, “माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये येऊ नका.” यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याजवळ येवून संबंधित व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली.

नेमकं काय घडलं?

“अरे कोण म्हणतं विदर्भात शिवसेनेची ताकद नाही? मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की, अजूनही पाऊस रुसलेला आहे. माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पाहिजे तसा पाऊस येऊ दे, नाहीतर त्याची मेहनत वाया जाईल. पुन्हा तेच दृष्टचक्र सुरु झालं. म्हणून मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे माझ्या तुमच्या भेटीचा एकच अर्थ आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर सभागृहात अचानक गोंधळ उडू लागला.

…आणि उद्धव ठाकरे भडकले

यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. “जरा थांबा. वाद घालायचा असेल तर बाहेर जा. कोण आहेत ते? त्यांना बाहेर घेऊन जा. बसून घ्या. बाहेर जा दादा आपण, प्लीज बाहेर जा. प्लीज बाहेर जा. मग, बसा तुम्ही खाली. माझ्या आणि माझ्या लोकांच्या मध्ये येऊ नका. प्लीज बाहरेजा. चला बसा सगळ्यांनी. ठीक आहे, चला बसा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्याजवळ आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना संबंधित व्यक्ती हा एका वृत्तपत्राचा पत्रकार आहे, असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “असूदे, लोकांच्या आणि माझ्या मध्ये येऊ नका. माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये येऊ नका. सगळ्यांनी बसा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण कधीच युती करणार नाही, असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी केलं होतं. पण आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादीसोबत भाजपने युती केली आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.