उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मिलिंद नार्वेकर यांची तक्रार?; काय म्हणाले जयंत पाटील?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आले आहेत. उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी आले आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अधिवेशनातील चर्चा, मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची हसता हसता तक्रार केली.

उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मिलिंद नार्वेकर यांची तक्रार?; काय म्हणाले जयंत पाटील?
jayant patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 8:57 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 18 डिसेंबर 2023 : राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. तर बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केली आहे. त्यामुळे राज्याचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरत असतानाच अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही एन्ट्री झाली आहे. उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी आले आहेत. यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची हसता हसता तक्रार केली.

उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अधिवेशनातील चर्चा, मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनीही सर्वांचं ऐकून त्यांच्याशी संवाद साधला. काही सूचना केल्या.

तक्रार काय?

यावेळी जयंत पाटील यांनी हसता हसता ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तक्रार केली. इथं चर्चा करण्यापेक्षा तिथं डायनिंग टेबलजवळ जागा आहे. सारखं साहेबांना गडबडीत घेऊन जायचं बंद कर. साहेबांना थोडावेळ आमच्यासोबत पण बसू दे. आम्ही काय आग्रह करायला लागलो की सर सर करता, अशी तक्रार जयंत पाटील यांनी हसता हसता केली. त्यावर साहेबांना तुम्ही लांबवण्याचा प्रयत्न केला तरी होऊ देणार नाही, असं मिलिंद नार्वेकर म्हणाले. हा संवाद सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न केला. सगळे मुंबईत कधी येताय सांगा? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांना अधिवेशन भरकटवायचं होतं

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशनात विदर्भावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण या सरकारने पहिल्या दिवसापासून याची चौकशी लाव. त्याची एसआयटी लाव हेच सुरू आहे. त्यावरून या सरकारला अधिवेशन भरकटवायचं होतं हे स्पष्ट झालंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.