केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी प्रतिष्ठित नागरिकांशी नागपूर कट्ट्यावर चर्चा केली. नागरिकांची मते जाणून घेतली. बॉटनिकल गार्डनसाठी देशभरात फूल शोधतोय, असं सांगून गार्डन विकसित करणार असल्याचं आश्वासन दिलंय.
नागपूर : नागपूरच्या साऊथ सेंट्रल झोनमध्ये नागपूर कट्टा (Nagpur Katta) आयोजित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांसोबत चर्चा केली. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकही यावेळी उपस्थित होते. तेच ते काम करून सगळे कंटाळले आहेत. आम्ही सुद्धा कंटाळलो आहोत. त्यामुळं कट्टा हा प्रयोग चांगला आहे. वेगळ्या गोष्टी आऊट ऑफ बॉक्स व्हायला पाहिजे. त्या या ठिकाणी होत आहेत. गडकरी म्हणाले, मी सध्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती देशाच्या कानाकोपऱ्यात शोधत आहे. नागपूरच्या बॉटनिकल गार्डनला (Botanical Gardens) फ्लावर गार्डन बनवायचं आहे. त्यासाठी 25 कोटी रुपये सुद्धा देण्याचं ठरविलं आहे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
इनोव्हेटिव्ह गोष्टींना प्राधान्य
काही फूल नागपूरच्या वातावरणात होत नाहीत. त्यासाठी नेट लावून ते जगवायचं ठरविलं. त्याच काम सुरू झालंय. फुटाळा तलावाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही फूड पार्क तयार करत आहोत. रिव्हालविंग रेस्टारंट, 3 मजली पार्किंग त्या ठिकाणी तयार करणार आहोत. माझ्या घरी शीमला मिरची, सांभार सारख्या भाज्या लावतो. त्या आम्ही खातो. बॉटनिकल गार्डनसाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनीसुद्धा आपल्या घरी असलेल्या फुलांच्या जाती आम्हाला द्याव्या. त्या आम्ही तिथे लावू. नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने कोणाच्या मनात काही कल्पना असेल त्यांनी त्या पुढे आणाव्यात. इनोव्हाटिव्ह गोष्टींना प्रोत्साहन द्यावे, असंही गडकरी म्हणाले.
हेरिटेस वास्तू विकसित व्हाव्यात
या चर्चासत्रात पत्रकारांना बोलवावं. मात्र फक्त बातमी कव्हर करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी नाही. आम्ही एक इलेक्ट्रिक बस आणली. ती वृद्ध लोकांना शेगावला जाण्यासाठी ठेवली. त्याचा मोठा फायदा होत आहे. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून जाते. काही गोष्टी करत असताना अनेक अडचणी येतात. खास करून हेरिटेजमध्ये असलेल्या वास्तू त्यासाठी परवानगी मिळत नाही. हेरिटेज वस्तूला विकसित करत असताना त्या विकसित तर होतील. मात्र त्यात बदल होऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं गडकरी यांनी आवर्जून सांगितलं.