Video | Hair cutting | तुम्ही म्हणाल ही तर ‘गॉन केस’? पण तसं नाहीए, शिवा 20 कैच्या हातात घेऊन कापतो केस

शिवा खापरकरच्या रक्तातच हेअर कटिंगचे संस्कार झालेले आहेत. त्याचे वडिलही याच व्यवसायात होते. वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात शिवानं काहीतरी हटके करण्याचं उद्दीष्ट ठेवलं.

Video | Hair cutting | तुम्ही म्हणाल ही तर 'गॉन केस'? पण तसं नाहीए, शिवा 20 कैच्या हातात घेऊन कापतो केस
अवलिया हेअरड्रेसर
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:21 PM

नागपूर : केस कापण्यासाठी किती कैच्या लागतात? फारफार तर चार. जास्त चांगला कट मारायचा असेल तर 10 लागत असतील! पण केस कापण्यासाठी चक्क एकाच वेळी 20 कैच्या घेऊन कुणी केस कापतं का? तुम्ही म्हणाल ‘नाही’! पण एक नागपूरचा अवलिया आहे, ज्यानं खरंच 20 कैच्या हातात घेऊन केस कापण्याची किमया केली आहे. या अवलियाचं नाव आहे शिवा खापरकर (Shiva Khaparkar). काम आहे, 20 कैच्या एकाचवेळी हातात घेऊन केस कापणं.

प्रत्येकी एका हातात 10 कैच्या

जुना रेकॉर्ड ते नवा रेकॉर्ड

नागपुरात (Nagpur) एक नवा रेकॉर्ड करण्यात आला होता. 20 तासांत तब्बल 407 जणांचे केस कापण्याचा. या रेकॉर्डची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्येही (Limca book of records) नोंदवण्यात आली होता. हा रेकॉर्ड करणारा शिवा खापरकरनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत 20 कात्र्यांनी केस कापण्याचा हा नवा आणि अनोखा विक्रम नोंदवलाय.

..म्हणून 20 कैच्यांचा प्रयोग!

नाभिक एकता मंचाच्या वतीनं नागपूरच्या नगाजी महाराज सभागृहात मार्गदर्शन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नाभिक समाजातील युवकांचं आदर्श असलेल्या शिवा खापरकर यानं याच व्यासपीठावर हेअर-ड्रेसर अर्था केशकर्तनकार म्हणून एक अनोखी गोष्ट केला. प्रत्येकी एका हातात त्यानं १० कैच्या पकडल्या. दोन हातात 20 कैच्या पकडून दोन युवकांचे केस कापण्याचा लाईव्ह डेमोही शिवानं यावेळी दाखवला.

चर्चा तर होणारच!

शिवा खापरकरच्या रक्तातच हेअर कटिंगचे संस्कार झालेले आहेत. त्याचे वडिलही याच व्यवसायात होते. वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात शिवानं काहीतरी हटके करण्याचं उद्दीष्ट ठेवलं. त्यातूनच त्यानं वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी धडपड सुरु केली. आपल्या सुपीक डोक्यातून क्रिएटिव्ह कल्पनांना जन्म देत लोकांच्या डोड्यावरील केस कापताना हटके काहीतरी करणाऱ्या शिवाची सध्या हेअर-ड्रेसिंगच्या क्षेत्रात चर्चा रंगली आहे. स्वतःला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या शिवा हा नाभिक समाजातील युवकांचा आदर्श बनलाय.

Video | बघा 20 कैच्या हातात घेऊन कसा केस कापतो शिवा 

पाहा व्हिडीओ – 

इतर बातम्या –

Video: टॉय ट्रॅक्टरने चिमुरड्याने अख्खा जेसीबी ओढला, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून आमचा दिवस आनंदात गेला!

RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्यावर परदेशी व्यक्तीचा जबरदस्त डान्स, Video लोकांना चांगलाच भावना

 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.