Video | नागपूरच्या बिशॉप कॉटन स्कूलमध्ये तोडफोड, अज्ञातांनी फोडल्या दारुच्या बॉटल्स

नागपूरच्या बिशॉप कॉटन स्कूल येथे तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड अज्ञान लोकांनी केली आहे. ही शाळा धरमपेठ येथील व्हीआयपी रोडवर आहे. वर्गखोल्यांमध्ये दारुच्या बॉटल्स फोडण्यात आल्या.

Video | नागपूरच्या बिशॉप कॉटन स्कूलमध्ये तोडफोड, अज्ञातांनी फोडल्या दारुच्या बॉटल्स
नागपूरच्या बिशॉप कॉटन स्कूलमध्ये तोडफोड करण्यात आली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:12 PM

नागपुरात गुंडांचा हैदोस कमी होण्याचं नाव घेत नाही. आता तर चक्क शाळेलाच निशाणा बनविण्यात आलाय. धरमपेठ येथील (Dharampeth) व्हीआयपी रोडवरील बिशॉप कॉटन स्कूलला (Bishop Cotton School) दोन दिवस सुट्टी होती. मात्र आज सकाळी शाळा उघडताच शाळेच्या आवारात असलेल्या कुंड्या तोडण्यात आल्याचे दिसल्या. एक दोन नाही तर दिसेल ती कुंडी अज्ञात इसमांनी तोडली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर क्लासरूमच्या आतमध्ये दारूच्या बॉटल्स फेकण्यात (Liquor bottles smashed in classrooms) आल्या. अर्थिनसाठी लावलेली तार सुद्धा या गुंडांनी तोडली. महत्वाचं म्हणजे अशा घटना या ठिकाणी वारंवार घडत असतात. मात्र त्यावर लगाम लावला जात नाही. रोडच्या बाजूला असलेल्या बस स्थानकावर रात्रीच्या वेळी समाज कंटक बसतात. तिथे दारू पितात आणि नंतर अश्याप्रकारे हैदोस घालण्याचा काम करतात. याची तक्रार पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी दोन कर्मचारी शाळेत तैनात केलेत. शाळेत झालेल्या तोडफोडीची तक्रार मुख्याध्यापिका सोनिया सिंग यांनी पोलिसांत केली आहे.

कशी घडली घटना

दोन दिवस शाळेला सुटी होती. आज सकाळी शाळा सुरू करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शाळेतील कुंड्या फोडण्यात आल्या. काही ठिकाणी दारुच्या बॉटल्स फोडण्यात आल्या आहेत. शाळेला सुटी असल्यानं दारुड्यांनी या ठिकाणाला आपला अड्डा बनविला असेल. त्यातून ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ

नुकसान काय झालं

कुंड्यांमध्ये रोपटे लावण्यात आले होत्या. त्या कुंड्यावरच हा राग काढण्यात आला. या घटनेमुळं शाळेचं प्रशासन हादरलं आहे. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शाळा हे पवित्र ठिकाण समजलं जाते. पण, शाळेत कुणी नसल्याचं पाहून समाजकंटकांनी या शाळेलाच दारुचा अड्डा बनविला. दारु जास्त झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाला असावा. यातून त्यांनी ही तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

Video Washim : बैलजोड्यांच्या किमती वाढल्या, ट्रॅक्टरची मशागत परवडेना; मग काय राव घोड्यांनाच जुंपले…

Video Nagpur | इंदिरा गांधी रुग्णालयात सापडला मसन्याऊद; प्राण्याला पाहून रुग्णांमध्ये भीती, नागपूर वनविभागाच्या दिले ताब्यात

Nagpur Crime | 17 वर्षीय मुलगी पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.