Nagpur College | महाविद्यालयीन युवकांसाठी विविध सरकारी योजना; जाणून घ्या रोजगार, शिष्यवृतीची माहिती

प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत.

Nagpur College | महाविद्यालयीन युवकांसाठी विविध सरकारी योजना; जाणून घ्या रोजगार, शिष्यवृतीची माहिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 4:00 AM

नागपूर : विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार (Entrepreneurship, business and employment) निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यासंदर्भात माहिती देण्यासाठी संवाद अभियान – युवा संवाद सारखे (Dialogue Campaign – Youth Dialogue) कार्यक्रम सुरू करण्यात आलेत. महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी समान संधी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेतील. महाविद्यालयातच समान संधी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या (Post Matric Scholarship Scheme) सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात येतात. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

समाज कल्याण आयुक्तांनी दिले निर्देश

सदर समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येते. रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याद्वारे करण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयात माहिती देण्यात येणार आहे. इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरूपाची केंद्रे तात्काळ चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समान संधी केंद्र स्थापन करा

प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने नागपूर विभागातील सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण यांना डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी निर्देश दिलेले आहेत.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.