“मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण ओबीसी असल्यानं हे खातं भेटले”, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केलाय.

मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण ओबीसी असल्यानं हे खातं भेटले, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
विजय वडेट्टीवार, काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 4:11 PM

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केलाय. त्यामुळे आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो, तरी 25 लाखांची सभा होईल. ‘झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये’. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली (Vijay Wadettiwar serious allegation about ministry distribution).”

“कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरुन गुन्हे दाखल करा”

“विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना. पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं भेटलं होतं. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे,” असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

“मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू”

विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.

“आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं, वेळ आली तर पंतप्रधानांच्या पाया पडू”

“मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

OBC Meeting | लोणावळ्यातील सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस

पंकजा मुंडे, वडेट्टीवार म्हणाले, निवडणुका होऊ देणार नाही, आता 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर

VIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार?, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान

व्हिडीओ पाहा :

Vijay Wadettiwar serious allegation about ministry distribution

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.