कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

देशी कुत्र पाळणाऱ्यांसाठी एक संधी आहे. ही संधी प्राणी मित्र संघटनेनं उपलब्ध करून दिली आहे. अभिनव उपक्रमामुळं घरात नवा प्राणी येईल. मोकाट कुत्र्यांना मायेची ऊब मिळेल.

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:00 AM

नागपूर : रस्त्यावरून फिरत जगण्याची धडपड करणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या पिल्लांना प्राणी मित्रांच्या मदतीने हक्काचे घर आणि मायेची ऊब मिळाली. नव्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. नवा मित्र मिळाल्याने बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सामाजिक आणि प्राणीमित्र संघटनांच्या सहकार्यातून भटक्या कुत्र्याच्या पिल्लांना दत्तक देण्याचा (Adoption of animal ) अभिनव उपक्रम पार पाडला. नागपूर नेटवर्क फार ऍनिमल वेलफेर आणि द बार्क क्लबतर्फे सिव्हिल लाईनच्या चिटणवीस सेंटरमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. गंगाधरराव चिटणवीस ट्रस्टचेही (Gangadharrao Chitnavis Trust) सहकार्य लाभले. देशी कुत्र्यांचे पिल्लू (native puppy) दत्तक देण्याचे आणि घेऊन जाण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. त्यानुसार इच्छुकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

मोकाट कुत्र्यांच्या पिल्लांना मायेची ऊब

पिल्लांना जन्म दिल्यानंतर अपघात अन्य कुत्र्यांकडून होणारे हल्ले किंवा अन्य कारणाने कुत्री दिसेनाशी होतात. जग कळण्यापूर्वीच या अवघ्या काही दिवसांच्या या बाळांना जगण्याची धडपड करावी लागते. वाहनाखाली येऊन ते चिरडले जाण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी कोणीतरी भूतदया दाखवित पिल्लांच्या खाण्यापिण्याची सोय करतो. त्यातून जिव्हाळा निर्माण होतो. पण पूर्ण वेळ ही मदत शक्य नाही. अशा पिल्लांना संस्थेकडे सोपविण्यात आले. त्यातील बहुतेक पिल्लांना नागरिकांनी दत्तक घेतले. बच्चे कंपनी पिल्लांना अगदी कुशीत घेऊन आनंदाने घरी परतली. देशी कुत्र्यांच्या भटक्या पिल्लांना दत्तक देण्याचा हा भावनिक सोहळा अनेकांनी आपल्या डोळ्यात साठविला.

दरवर्षी दोन हजार पिल्लांना मदतीचा हात

भटक्या प्राण्यांसाठी शहरातील द बार्क क्लब ही संस्था गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. आजारी किंवा जखमी पिल्लांना उपचार मिळवून देण्यासह कुणीतरी त्यांना दत्तक घ्यावे. यासाठी संस्थेच्या अडीचशे सदस्यांची नेहमीच धडपड सुरू असते. दररोज किमान चार ते पाच पिल्लांना अशाप्रकारे मदत केली जाते. वर्षाला दोन हजाराहून अधिक पिल्लांना मदत आणि त्यातील अनेकांना घरही मिळते. यामुळं मुक्या प्राण्यांना प्रेम, आपुलकी मिळते. प्राणीप्रेमींनाही याचा आनंद होतो. एकच मुलं असण्याचे प्रमाण वाढले, अशावेळी त्यांच्याशी खेळण्यासाठी घरी कुत्रं आणलं जातं.

HSC SSC Exam : शिक्षण ऑनलाईन झालं, दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, कोल्हापूर नागपूरमध्ये विद्यार्थी पालकांचं आंदोलन

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण

HSC SSC Exam Date | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.