AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agrovision | बांबू लागवडीचे फायदे काय? नितीन गडकरींनी दिली बांबू टिश्यू कल्चरची माहिती

बांबूची लागवड करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. अग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून आज बोलत होते.

Agrovision | बांबू लागवडीचे फायदे काय? नितीन गडकरींनी दिली बांबू टिश्यू कल्चरची माहिती
अॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री तोमर व इतर.
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:51 PM

नागपूर : बांबू हे गवत आहे कोळशाला पर्याय म्हणून याचा वापर करता येतो. शिवाय बांबूपासून जर्सी तयार करता येते. या जर्सीमुळं घाम फुटत नाही. बल्लारपूर येथे भिमा बांबूचे उत्पादन एकरी 200 टन उत्पादन होते. पॉवर प्लांटसाठी बांबू उपयोगात येतो. त्यामुळं बांबूची लागवड करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. अग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून आज बोलत होते.

ड्रोनने करा फवारणी

फवारणी ड्रोनची किंमत सहा लाख रुपये होती. लिथियम बॅटरीवर ते चालत होते. आता फ्लेक्स इंजीन इथेनॉलवर चालणार आहे. यामुळं ड्रोनचा खर्च कमी होईल. नॅनो युरियाचा अर्थ पाचशे एमएलची बॉटल. ही युरियाच्या कित्तेक पटीनं काम करते. हातानं खत टाकल्यास युरिया 70 टक्के वाया जातो. 30 टक्के उपयोगी येतो. तर, ड्रोनने फवारणी केल्यास याच्या उलट होते. 30 टक्के वाया जाते, 70 टक्के उपयोगी पडते. गावागावात यातून रोजगारही निर्मिती होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

सीएनजीवर ट्रक्टर सुरू व्हावेत

प्राकृतिक शेतीसाठी आचार्य देवव्रत, सुभाष पाळेकर हे काम करतात. जीवामृताचा वापर करतात. सेंद्रीय पद्धतीचा भाजीपाला निघत असल्यानं त्याला मागणी जास्त आहे. आधी बाजारात 8 टक्के दलाली लागत होती. आता थेट ग्राहकाला विक्री करतात. त्यामुळं रेट चांगला मिळतो. सेंद्रीय भाजीपाल्यासाठी सर्टिफिकेशनची साधी पद्धती करण्यात यावी. जैविक शेती, प्राकृतिक शेतीकडं आम्ही जात आहोत. नॅनो फर्टिलायझर, मिक्स खतांचा वापर करता आहोत. आता सीएनजीवर ट्रक्टर सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न असल्याचं गडकरी म्हणाले.

मासळ येथे तणसापासून सीएनजी

पूर्व विदर्भात धानपीक मोठ्या प्रमाणत होते. धान घरू घेऊन आल्यानंतर तणस शेतात राहते जनावरांच्या चाऱ्यासह या तणसाचा दुसराही उपयोग करता येतो. त्यामुळं तणसापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प तयार होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. पैसे वाचविणे हे पैसे कमविण्यासारखे असल्याचं ते म्हणाले.

Nagpur Omicron | ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडला; प्रशासन अलर्ट झोनमध्ये

Gondia Saras| सारस पक्ष्यांबद्दल उदासीनता बरी नव्हे! उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले; पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश

'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.