NMC Election | नागपूर मनपाचा प्रभाग आराखडा केव्हा जाहीर होणार?; नगरसेवक, इच्छुकांचे वाढले टेन्शन!

नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग आराखडा केव्हा जाहीर होणार, या चिंतेने नगरसेवक तसेच इच्छुकांचे टेन्शन वाढविले आहे. सोशल मीडियावर एक प्रभाग आराखडा फिरत आहे. तो खरा की, खोटा याची चौकशी होणे आवश्यक आहे.

NMC Election | नागपूर मनपाचा प्रभाग आराखडा केव्हा जाहीर होणार?; नगरसेवक, इच्छुकांचे वाढले टेन्शन!
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 6:09 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) निवडणुकीत यावेळी तीन सदस्यीय प्रभाग असणार आहेत. गेल्या वेळी एका प्रभागातून चार सदस्य निवडूण आले होते. यंदा यात बदल करण्यात आला. पण, प्रभागाचा आराखडा अद्याप जाहीर व्हायचा आहे. तरीही सोशल मीडियावर एक प्रभाग आराखडा फिरत आहे. तो खरा की, खोटा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहा जानेवारीला हा प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाला पाठवावयाचा होता. परंतु, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यामुळं नागपूर मनपा अधिकाऱ्यांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता.

आराखडा व्हायरल झालाय कसा

आराखडा अधिकृत स्वीकारण्यात आला नसला, तरी एक आराखडा सोशल मीडियावर धूम करत आहे. हा आराखडा ज्यांच्या सोयीचा नाही. त्यांचे टेन्शन वाढले आहे. नगरसेवक व इच्छुक धाकधुकीवर आहेत. आता हा आराखडा खरा असेल, तर आपले काय होणार, अशी चिंता काहींना सताऊ लागली आहे. प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी मनपाची आहे. ही गोपनिय प्रक्रिया असल्यानं अद्याप आराखडा जाहीर करण्यात आला नाही. तरीही सोशल मीडियावर हा 52 प्रभागांचा आराखडा व्हायरल झाला आहे. याप्रकरणी व्हायरल झालेला आराखडा खरा असेल, तर तो कसा व्हायरल झाला. याला जबाबदार कोण, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांना महापालिका आयुक्तांना लिहिले आहे.

26 प्रभागांत दोन महिला व एक पुरुष

नागपूर मनपा निवडणुकीत 52 प्रभाग आहेत. 156 नगरसेवक त्यामधून निवडूण येतील. 78 जागा महिलांसाठी राखीव राहतील. 26 प्रभागांत दोन महिला व एक पुरुष अशी रचना राहणार आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य हा आराखडा ठरविणार आहे. त्यात सोशल मीडियावरील आराखड्याने काहींचे टेन्शन आणखी वाढविले आहे. काही नगरसेवकांमध्ये या आराखड्याबद्दल संभ्रम आहे.

Amravati | नवोदित युटुबर्सचा पालकमंत्री ठाकूर यांनी केला सत्कार; सेल्फीही घेतली, विजय खंडारे कसा झाला फेमस?

भंडाऱ्यात चाललंय काय? पती-पत्नीचा वाद; दोघांनीही रॉकेल ओतून पेटवून घेतले, चिमुकल्याचा वाली कोण?

Nagpur Crime | सासूसोबत झाला वाद, मुलाला विष पाजून स्वतःही घेतले; दीड वर्षीय बाळाचा मृत्यू..

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.