AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरातील ८० टक्के भिकारी गेले कुठं?; पोलिसांचे आदेश नेमके काय?

नागपूर शहरात भिक मागणारे चौकाचौकात उभे असतात. याविरोधात नागरिकांकडून ओरड होत असते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण, आता जी-२० च्या निमित्ताने शहरात भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली.

नागपुरातील ८० टक्के भिकारी गेले कुठं?; पोलिसांचे आदेश नेमके काय?
| Edited By: | Updated on: Mar 09, 2023 | 11:44 AM
Share

नागपूर : G- 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी भिक मागण्यास बंदी घातलीय. भिक मागीतल्यास कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल होणार आहे. पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीनं नागपुरातील ८० टक्के भिकारी शहर सोडून गेलेत. शहरातील चौका-चौकात ऐरवी मोठ्या संख्येने भिकारी लहान मुलं खांद्यावर घेऊन भिक मागायचे. पण आता या चौकांमधून भिकारी अचानक गायब झालेय. नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरात एक हजार पेक्षा जास्त भिकारी वर्षानुवर्षे राहतात. पण पोलीस आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. शहरात ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत शहरातील रस्त्यावर भिक मागण्यास बंदीचे आदेश दिले. त्यानंतर नागपुरातील ८० टक्के भिकारी गायब झालेत. शहर सोडून गेलेत.

शहरातील भिकाऱ्यांविरोधात मोहीम

नागपूर शहरात भिक मागणारे चौकाचौकात उभे असतात. याविरोधात नागरिकांकडून ओरड होत असते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पण, आता जी-२० च्या निमित्ताने शहरात भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली. भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यामुळे शहरातील सुमारे ८० टक्के भिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

चौकात वाहनचालकांकडून वसूल करायचे पैसे

बरेचदा शहरातील चौकात भिकारी वाहनचालकांकडून पैसे घेत होते. विविध पद्धतीने त्रासही देत होते. अचानक वाहनाच्या समोर येऊन ठेपायचे. अशावेळी वाहनचालक अडचणीत सापडायचा. शिवाय वाहतुकीची कोंडीही होत होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

एक भिकारी दारुसाठी मागतो भिक

सीताबर्डी चौकातील एक भिकारी दारुसाठी भिक मागतो. काही भिकारी दारुची नशा करण्यासाठी पैसे मागायचे. पैसे मिळाले की, दारु पिऊन टुन्न राहायचे. भिकाऱ्यांच्या बंदोबस्ताची मागणी काही नागरिकांकडून होत होती. यावर जी-२० च्या निमित्ताने का होईना, कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळं शहरातील रस्त्यांवरील भिकाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. पण, आता यापैकी बरेच भिकारी शहरातून गायब झाले आहेत. कारवाईचा बडगा उभारल्याने घाबरले आहेत.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.