विधान परिषद निवडणुकीत युतीच्या जागा कमी का झाल्यात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात,…

जुन्या पेंशनच्या बाबतीत शिक्षण विभाग काम करतोय. त्यावर नक्की विचार सुरू आहे. हे सरकार सर्व घटकांना न्याय देणारं आहे. विकासावर भर देत आहोत. कर्मचाऱ्यांच्या समस्याची सोडविणार आहोत.

विधान परिषद निवडणुकीत युतीच्या जागा कमी का झाल्यात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात,...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:07 PM

वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही विशिष्ट प्रकारची निवडणूक (Election) होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या. भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडं दोन जागा होत्या. कोकणातली जागा आपण जिंकली. नाशिकची जागा भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने जिंकण्यात आली. ज्याकाही जागा यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत. याची कारण मिमांसा केली जाईल. विचार करून त्यात सुधारणा केली जाईल.

जुन्या पेंशनबाबत काय…

जुन्या पेंशनच्या बाबतीत शिक्षण विभाग काम करतोय. त्यावर नक्की विचार सुरू आहे. हे सरकार सर्व घटकांना न्याय देणारं आहे. विकासावर भर देत आहोत. कर्मचाऱ्यांच्या समस्याची सोडविणार आहोत. शिक्षकांसाठी ११ शे कोटी रुपये दिलेत. शिक्षक हे आमचेच आहेत. त्यामुळं त्यांनी याचाही विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

हे सरकार पुन्हा येईल

बच्चू कडू हे महाविकास आघाडीत अस्थिरता आहे म्हणाले. आमच्याकडं १७० आमदार आहेत. त्यामुळं हे सरकार स्थिर आहे, हे सांगण्याची मला आवश्यकता नाही. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. या राज्यातील जनतेला न्याय देईल. पुढच्या निवडणुकीतदेखील हे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या पाठीशी

मराठा समाजाच्या पाठीशी हे सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरही सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

महापुरुषांचा इतिहास दाखविणार

बापुकुटीला भेट दिल्यानंतर त्यावेळचा काळ आठवला. त्यांच्या वस्तू, आठवणी आहेत. समर्पित भावनेने त्यांनी लोकांनी सेवा केली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेला भेट देण्यासाठी हजारो लोकं येतात. त्यांना प्रेरणा मिळते.

वर्धा येथील विकासकाम केली जातील. शिवाय लेझर शोच्या माध्यमातून महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा इतिहास दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.