Praveen Togadia | भाजपची सत्ता असताना भोंगे बंद का केले नाही? नागपुरात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा भाजपवर हल्लाबोल
मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट केला जात असल्याचा आरोप भाजपवर होतोय. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करा. महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती तेव्हा भोंगे बंद का केले नाही, असा सवाल तोगडिया यांनी केलाय.
नागपूर : नागपूर : हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया (Dr. Praveen Togadia) यांनी मंगळवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, भाजपने व केंद्र सरकारने (Central Government) आधी भाजपशासित राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवावेत. केंद्राने यासंदर्भात आदेश काढावा. दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे. रात्री दहा वाजतानंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवित आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्र सरकार जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना भोंगे काढण्याचे थेट आदेश देऊ शकतो. मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट केला जात असल्याचा आरोप भाजपवर होतोय. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (International Hindu Council) अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करा. महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती तेव्हा भोंगे बंद का केले नाही, असा सवाल तोगडिया यांनी केलाय.
हिंदूंनी सावध राहीलं पाहिजे
देशात महागाईवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली पेटविण्याचे काही षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय हिंदूंनी यापासून सावधान राहायला हवे, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. भाजपने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केली तेव्हा भाजपने हिंदुत्व सोडले, अशी टीका कुणी केलेली नव्हती. आता शिवसेनेने भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हणणे चुकीचे आहे, असंही ते म्हणाले.
पदभरती करण्याची मागणी
राष्ट्रीय स्वंयसंघाचे सरसंघचालकांनी पंधरा वर्षांत अखंड भारत होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे स्वागत आहे. पण, सत्तेत नसताना आश्वासन दिले जाते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे, असं तोगडिया म्हणाले. गेल्या सात वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जावी अन्यथा बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला.