देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर? भाऊबीजेची अगोदरच देणार ओवाळणी? कोण आहेत निलीमा बावणे?

Nilima Bawane on Legislative Council : भाजपाने विधानसभा निवडणुकीत विजयाची त्सुनामी आणली. भाजपा महायुतीमधील सर्वात मोठा भाऊ ठरला. या विजयात लाडक्या बहि‍णींचे पण मोठे योगदान आहे. त्यातच नागपूरमधील या बहिणीने या विजयात मोठा वाटा उचलला आहे. तिला आता पक्षाकडून मोठी अपेक्षा आहे.

देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर? भाऊबीजेची अगोदरच देणार ओवाळणी? कोण आहेत निलीमा बावणे?
देवेंद्र फडणवीस निलीमा बावणे
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 10:57 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली. सर्वांचे अंदाज चुकवत या पक्षाने राज्यात मांड ठोकली. लाडक्या बहि‍णींनी भरभरुन मतदान केल्याचा फायदा महायुतीला झाला. सर्वच भागात महाविकास आघाडीचा धुवा उडाला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. नागपूरमधील दक्षिण-पश्चिम मतदारसंघात त्यांनी पुन्हा करिष्मा दाखवला. या ठिकाणी सुद्धा लाडक्या बहि‍णींनी त्यांना साथ दिली. त्यातच नागपूरमधील या बहिणीने या विजयात मोठा वाटा उचलला आहे. तिला आता पक्षाकडून मोठी अपेक्षा आहे.

निलीमा बावणे यांना हवी आमदारकी

लाडक्या बहिणींमुळे भाजपला मोठा विजय मिळाल्याने भाजपाच्या महिला नेत्या विधानपरिषदेवर दावा करत आहेत. विधानसभा निवडणूकीत महिलांच्या वाढलेल्या मतदानामुळे भाजपच्या नेत्या निलीमा बावणे यांनी पक्षाकडे विधानपरिषदवर घेण्याची आग्रही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना निलीमा बावणे या प्रस्तावक होत्या. गेले अनेक वर्षे भाजप आणि सामाजिक जीवनात काम करत असलेल्याने दावेदारी प्रबळ असल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेत तिकीट देण्यात आले नाही, आता पक्षाकडे विधानपरिषद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्या भेटणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत निलीमा बावणे?

मध्य भारतात दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही महिलांसाठीच नाही तर गरजूंसाठी हक्काची पतसंस्था, बँक आहे. निलीमा बावणे यांनी या पतसंस्थेचे रोपटे लावले. 1994 मध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे ही पतसंस्था अस्तित्वात आली. सुरुवातीला 50 रुपये जमा करुन, बचत करुन गटामार्फत आर्थिक व्यवहार झाले. त्यानंतर त्यांनी पतसंस्था सुरू केली. 1994 पासून ही पतसंस्था सुरू झाली. या पतसंस्थेचे सव्वा लाखांहून अधिक सभासद आहेत. आता ही पतसंस्था मल्टीस्टेट झाली आहे. तिच्या शाखा राज्यातच नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पण आहेत. त्यांनी सामाजिक कार्यातून सुद्धा त्यांची ओळख निर्माण केली आहे. महिलांना स्वालंबी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आता त्यांनी विधान परिषदेवर दावा केला आहे. पक्षाकडे त्यांनी ही आग्रही मागणी केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.