Gadchiroli Nagar Panchayat | एटापल्ली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?, दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता तर सिरोंचात आदिवासी विद्यार्थी संघटनेची सत्ता स्थापन होणार, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचे किरण पांडव व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे दीपक आत्राम हेसुद्धा किंग मेकरच्या भूमिकेत राहणार आहेत. जिल्ह्यात नगरपंचायत निकालात भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही अनेक ठिकाणांहून सत्तेतून बाहेर राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली नगरपंचायतीत (Gadchiroli Nagar Panchayat) सत्तेचे समीकरण बदलणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता नगरपंचायतमध्ये स्थापन होऊ शकते. नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष विजयी झालेले दोन उमेदवार शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे (Shiv Sena entry) महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना बळ मिळणार आहे. नागेंद्र राजगोपाल सुलावार व सुनील कुडमेथे या अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. एटापल्ली नगरपंचायतीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेनेचे (Shiv Sena) दोन नगरसेवक निवडूण आलेत. यात दोन अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं महाविकास आघाडीकडं दह दहा नगरसेवक होतात. हे सर्व एकत्र आल्यास महाविकास आघाडीची सत्ता बसू शकते. एटापल्ली नगरपंचायतीत भाजप तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी तीन, काँग्रेस पाच आदिवासी विद्यार्थी संघटना दोन अपक्ष चार उमेदवार विजयी झाले होते. यात विजयी झालेल्या उमेदवारातून दोन अपक्ष उमेदवाराने काल रात्री शिवसेनेचे पक्षात प्रवेश केला.
किरण पांडव यांचे नेतृत्व
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक असलेले शिवसेना पक्षाचे किरण पांडव यांच्या नेतृत्वात या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याचे चित्र खुले झाले आहे. एटापल्ली नगरपंचायतीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचे दोन, अशा दहा नगरसेवकांची तयारी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्याची दिसत आहे. यात सत्ता स्थापन व्हावी यासाठी शिवसेनेचे किरण पांडे यांनी अनेक प्रयत्न करून विजयी अपक्ष उमेदवारांना एकत्र केले. नागेंद्र राजगोपाल सुटलावार व सुनील कुडमेते यांची वर्णी शिवसेना पक्षाकडून आता सत्तेत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सिरोंच्यात आदिवासी विद्यार्थी सेनेचे वर्चस्व
दुसरीकडे महाविकास आघाडीला बाजूला ठेवत सिरोंचा नगरपंचायतीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना सत्ता स्थापन करण्याचे चित्र पूर्णपणे खुले झालेले आहे. सिरोचा नगरपंचायतीत एकूण 17 नगरसेवक आहेत. यातून आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या दहा नगरसेवकांनी एकतर्फी विजय मिळविला. या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघटनेची सत्ता स्थापन होणार आहे. यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेने दहा नगरसेवकांना घेऊन तेलंगणा राज्य गाठले. हे दहा नगरसेवक सत्तास्थापनेच्या दिवशीच सिरोंचा नगरपंचायतीमध्ये हजर होणार असल्याची प्राथमिक माहिती टीव्ही नाईनच्या हाती लागली. या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला फक्त पाच नगरसेवक तर शिवसेना खात्यात दोन नगरसेवक आहेत. सात नगरसेवक मिळूनही सत्ता स्थापन करू शकत नाही, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची किंवा राष्ट्रवादी व शिवसेनेची झालेली आहे. सिरोंचा एटापल्ली या दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या सत्तेचे शिलेदार असले तरी एटापल्ली नगरपंचायत किरण पांडव किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. सिरोंचा नगरपंचायत आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते माजी आमदार दीपक दादा आत्राम किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.