Nagpur Yoga | कस्तुरचंद पार्कवर योगसाधना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती, देशातील 75 स्थळांमध्ये नागपूरचा समावेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकातील मैसूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले. यावेळी त्यांनी देशवासियांना योगसाधनेचे महत्व सांगून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

Nagpur Yoga | कस्तुरचंद पार्कवर योगसाधना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती, देशातील 75 स्थळांमध्ये नागपूरचा समावेश
कस्तुरचंद पार्कवर योगसाधना
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:52 PM

नागपूर : निरोगी आयुष्य जगण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक आहे. याबाबतचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत आहे. असं सांगून सर्वांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून दररोज योग साधना करावी. असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे (Madhavi Khode), जिल्हाधिकारी आर. विमला (Vimala R. ), महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य अलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर, जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, योगाचार्य भारतजी, सरोज गुप्ता यावेळी उपस्थित होत्या.

शारीरिक-मानसिक संतुलन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरातील 75 ऐतिहासिक स्थळांवर केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यामध्ये नागपूर येथील कार्यक्रमाचाही समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यावेळी योगसाधना केली. ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना होती. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राष्ट्रसंघामध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार 2015 पासून अनेक देशांमध्ये योग दिवस साजरा होत आहे. योगसाधनेचे महत्व जगभरात पोहचण्यास मदत झाली आहे. विदेशात अनेक ठिकाणी योगशास्त्र शिकविले जावू लागले आहे. दररोज नियमित योगसाधना केल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक संतुलन साधता येते. याचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

औषधोपचारापेक्षा योग साधना उपयुक्त

दररोज किमान एक तास योगसाधना केल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, अॅलोपॅथी औषधोपचारापेक्षा योग साधना ही उपयुक्त आहे. त्यामुळे दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. योगसाधनेतून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे श्री. गडकरी म्हणाले. योग प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांकडून योगाचे निस्वार्थीपणे, निःशुल्क प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांनी शहरातील बगीचा, मैदानांवर दररोज सामूहिक योगसाधना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जीवनात समाधान, सुख प्राप्त करण्यासाठी नियमित योगसाधना करणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. खांडवे यांनी जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळामार्फत योग प्रसारासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.