Nana Patole : निधीबाबत चुकीचा मेसेज जातोय, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, नाना पटोलेंचा सल्ला
आता तर थेट एक शिवसेना आमदाराचीच निधीवाटपासून खदखद बाहेर आली आहे. शिवसेना आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका निश्चित करावी असा सल्ला आता नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. या अडीत वर्षात महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेत अनेकदा चव्हाट्यावर आले आहे. त्याला प्रत्येक वेळी कारणं वेगवेगळी असली तरी मतभेत मात्र उघडपणे बाहेर आले. कधी नामांतराच्या मुद्यावरून काँग्रेसचा शिवसेनेच्या भूमिकेला थेट विरोध होताना. तर कधी नाना पटोले (Nana Patole) राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणताना उघडपणे दिसून आले. निधी वाटपावरूनही अनेकदा नेत्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले आहे. आता तर थेट एक शिवसेना आमदाराचीच निधीवाटपासून खदखद बाहेर आली आहे. शिवसेना आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका निश्चित करावी असा सल्ला आता नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी
चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्रानी आपली भूमिका निश्चित करावी असा सल्ला आता पटोलेंनी दिलाय. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत असल्याची गंभीर तक्रारी शिवसेना आमदारांनी केलीय. त्यानंतर आता आशा कामांना स्थागिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्याबाबत नांना पटोले बोलत होते. निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून ठरल्यांप्रमाणे निधी वाटप होने गरजेचे आहे. काँग्रेसनेही निधी वाटपात भेदभाव होण्याच्या तक्रारी अनेक वेळी केल्याा असल्याचे नाना पटोले बोलले आहेत.
आशिष जयस्वाल यांची तक्रार काय?
विकास निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय, शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदार संघात विकासकांना निधी दिला जातोय, अशी तक्रार शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या गंभीर तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी अशा कामांना स्थगिती दिलीय. तर निधी वाटपाबाबत होत असलेला अन्यायाचा लेखाजोगा तयार करण्याचे काम समन्वयक म्हणून आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे दिले आहे. ‘आम्ही आमदार आहोत म्हणून तुम्ही मंत्री आहात त्यामुळे आम्ही मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, विकास निधीचे समान वाटप झाले पाहिजे, आम्हाला डावलने आम्ही सहन करणार नाही’ असा थेट इशारा शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे आता यावर भाजपकडूनही जोरदार टीका होणार हे ठरलेलं आहे.