AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल

खाते वाटपावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल
| Updated on: Dec 22, 2024 | 3:34 PM
Share

शनिवारी मंत्र्यांना खात्याचं वाटप झालं, यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार कौरवा सारखं वागत असून आपसात लढून यांचा कार्यक्रम संपणार आहे. मलाईदार जिल्हा आणि मलाईदार खात्यासाठी याची लढाई चालली आहे. जनतेच्या प्रश्नांचं यांना काही देणं-घेणं नाही. आता पालकमंत्रिपदासाठी सुद्धा यांच्यामध्ये भांडण होणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉकपोलिंग घेतलं पाहिजे. जनतेचं मत चोरून हे सरकार आलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्यावरून असं वाटतं दाल मे कूच काला है, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. या टीकेला देखील यावेळी पटोले यांनी उत्तर दिलं आहे.  नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दाचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असं पटोले यांनी म्हटलं आहे.

मागील वेळेस 20 हजार कोटींचं बजेट अजित पवार यांनी मांडलं होतं. येणारं बजेट आणखी किती तुटीचं असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पडून महागाई वाढणार आहे. हे निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात आले आहेत. जनतेच्या कृपेने आलेले नाहीत.   महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळ असो की वागणं दोन्ही संवेदनाहीन आहेत, या सरकारला संवेदना नाहीत असंही यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.

कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.