मविआची अवस्था ‘एक अनार सौ बिमार’; अशोक चव्हाण यांचा नांदेडच्या सभेतून हल्लाबोल
Ashok Chavan on Mahavikas Aghadi : आज महायुतीची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या सभास्थळी दाखल होणार आहेत. या सभेत राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनीही भाषण केलं. काय म्हणाले? वाचा सविस्तर...
नांदेडमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेला थोड्याच वेळात नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्याआधी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण बोलत यांनी नांदेडकरांना संबोधित केलं. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचे फोटो लावून मत मागतात एवढी केविलवाणी अवस्था महाविकास आघाडीचे आहे. तेलंगणामध्ये असं झालं म्हणून महाराष्ट्रात मतदान द्या हे कुठलं लॉजिक आहे? आमच्याकडे कुठले वाद नाहीत, सगळ्यांमध्ये एक वाक्यात आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार ही रेस सुरू झाली आहे. अवस्था अशी झाली आहे एक अनार सौ बिमार…, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाणांकडून मोदींच्या कामाचं कौतुक
आपली उपस्थिती सांगून जात आहे, ही येणारी विधानसभा निवडणूक महायुती नक्कीच जिंकणार आहे. तिसऱ्यांदा यशस्वी पंतप्रधान म्हणून मोदींनी शपथ घेतली आहे. नांदेडसाठी त्यांच्या मनात वेगळी आत्मियता आहे.. विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड करण्याची आत्मीयता त्यांच्या मनात आहे. आम्ही निवडून आल्यानंतर मोदींनी शंभर दिवसाचा प्लॅन घोषित केला होता. त्यांनी बरोबर 100 दिवसात पायाभूत सुविधा कार्यक्रम दिला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारला वर्षाला 6000 देत होतं राज्य सरकारने त्यात 6000 घातले. राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार आहे, यामध्ये आणखीन तीन हजार घालून वर्षाला 15000 रुपये देण्यात निर्णय सरकारने जाहीर केला आहे. कर्जमाफी करायची आहे, हमीभाव सुद्धा वाढण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना आश्वस्त केलं.
मविआवर निशाणा
लाडक्या बहिणी विरोधकांना सांगतात आमच्या भरोशावर राहू नका. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि या मध्ये विकसित नांदेड राहणार आहे. विरोधात बसून काय करणार? लाडली बहीण, लाडला भाऊ आणि लाडका खासदार निवडून द्या. विरोधकांनी मागच्या निवडणुकीत दिशाभूल केली. मोदी पुन्हा सत्तेत आल्यामुळे तुमचं नुकसान झालं का? संविधान बदललं का? संविधानाच रक्षण करण्याचे काम आम्ही सगळेजण मिळून करत आहोत, असं म्हणत महाविकास आघाडीवर अशोक चव्हाणांनी निशाणा साधला आहे.