AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | सर्जा-राजावर सजून आले नवरदेव नवरी, नांदेडच्या लग्नात अस्सल सनई चौघड्यांचा बाज!

बैलगाडी ही शेतकऱ्यांची आहे, त्याच्याच मदतीने विवाह करावेत. जेणेकरून खर्च कमी होतील व खर्चाचा बोजा वधू-वर पित्यावर पडणार नाही, यासाठी सर्वांनी या गोष्टीला चालना द्यावी, असा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला.

PHOTO | सर्जा-राजावर सजून आले नवरदेव नवरी, नांदेडच्या लग्नात अस्सल सनई चौघड्यांचा बाज!
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 1:34 PM
Share

नांदेडः लग्न सोहळा (Marriage) म्हटलं की चकाचक गाड्या, वधु वराची भरपूर फुलांनी सजवलेली कार, बँड आणि डीजेच्या आवाजात निघालेली वरात, वऱ्हाडी मंडळींचा डान्स, धिंगाणा, असं काही चित्र आजकाल पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ही सजावट आणि थाट-माट करण्याची स्पर्धाच जणू आयोजकांमध्ये लागलेली दिसते. मात्र नांदेडमधील (Nanded Marriage) एका गावात या सगळ्या आधुनिक चढा-ओढीला फाटा देत अस्सल पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नासाठी नवरदेव आणि नवरीबाईला थेट बैलगाडीतूनच आणले गेले. तसेच लग्नात आलेली सगळी वऱ्हाडी मंडळीही सुंदर सजवलेल्या बैलगाडीतून (Bullock cart in Wedding) आले. त्यानंतर अस्सल पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. नांदेडच काय अवघ्या मराठवाड्यात सध्या या हटके विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे.

Nanded Wedding

नांदेड जिल्ह्यातील बारसदाव येथील सुशील बोरसे आणि शिवकन्या भालेराव या दोघांचा विवाह सोहळा अशा पारंपरिक बाजात करण्यात आला. यावेळी लग्नाला येताना नवरा-नवरी फुलं, पानं, फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीत आले. लग्न झाल्यावर याच बैलगाडीतून सुनबाईंना घरी नेण्यात आलं.

Nanded Wedding

जुन्या परंपरेनुसार, वऱ्हाडी मंडळी येथे बैलगाडीनं आली. तसेच आधुनिक पद्धतीनुसार, मिरवणुकीत डीजे ऐवजी सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरांचा आवाज होता.

Nanded Wedding

आधुनिक पद्धतीत खर्च जास्त करून विवाह करण्यापेक्षा जुन्या पद्धतीने लग्न सोहळे आयोजित करावेत. बैलगाडी ही शेतकऱ्यांची आहे, त्याच्याच मदतीने विवाह करावेत. जेणेकरून खर्च कमी होतील व खर्चाचा बोजा वधू-वर पित्यावर पडणार नाही, यासाठी सर्वांनी या गोष्टीला चालना द्यावी, असे मत नवरदेवाचे काका शिवाजीराव बारसे यांनी व्यक्त केले.

Nanded Wedding

इतर बातम्या

IND vs WI, 2nd ODI, Live Score: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, भारताची पहिली फलंदाजी

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 9 February 2022

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.