Nanded | तरोडा नाका परिसरात चिकनच्या दुकानांना आग, धुराचे काळेकुट्ट लोट, शेकडो कोंबड्या जळून खाक
आग लागल्यानंतर तत्काळ फायर ब्रिगेडला ही माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेड कर्मचारीही धावून आले. मात्र या वेळात दुकानातील शेकडो कोंबड्या भाजल्या.
नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) आज दुपारी तरोडा नाका भागातील चिकनच्या दुकानांना आग लागली. या आगीत दुकानातील शेकडो कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात तरोडा नाका (Taroda Naka) परिसरात दुकानाला आग लागण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे समोर आले आहे. आजच्या आगीत एका दुकानात लागलेली आग (Nanded Fire) इतर दुकानांमध्ये वेगाने पसरली. सलग सहा दुकानांनी पेट घेतल्यामुळे आगीचा मोठा भडका झालेला दिसून आला. धुराचे मोठे लोळ या परिसरात दिसून येत होते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये खळबळ माजली. सुदैवाने या घटनेत येथील दुकानदारांना इजा झाली नाही. मात्र आगीत चिकन विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Nanded | तरोडा नाका परिसरात चिकनच्या दुकानांना आग, शेकडो कोंबड्या जळून खाक pic.twitter.com/PbXl5WPwt6
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi Live (@tv9_live) May 13, 2022
गादी बनवणाऱ्या दुकानाला आग
तरोडा नाका भागातील एका गादी बनवणाऱ्या दुकानाला अचानकपणे आग लागली, ही आग आजूबाजूच्या चिकन मटणच्या दुकानात पसरली. त्यात एकूण सहा दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य आणि शेकडो कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. मात्र येथील दुकानदार किंवा कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही.
फायर ब्रिगेडने आग विझवली
दरम्यान आग लागल्यानंतर तत्काळ फायर ब्रिगेडला ही माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेड कर्मचारीही धावून आले. मात्र या वेळात दुकानातील शेकडो कोंबड्या भाजल्या. पाण्याचा मारा होईपर्यंत हा परिसर आगीच्या ज्वाला आणि धुराच्या लोटांनी धगधगत होता. आग विझवल्यानंतर पाहिलं तर दुकानांची राखरांगोळी झाली होती.
आगीच्या घटनांचे केंद्र
तरोडा नाका भागातील आज आग लागलेल्या ठिकाणी नेहमीच अश्या घटना होत असतात. कच्च्या स्वरूपाची ही दुकाने असल्याने ती बनवताना लाकडाचा आणि प्लायवूडचा वापर झालाय. त्यातून इथे आग लागली की ताबडतोब आजूबाजूच्या दुकानात पसरते, आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.