Gram Panchayat Election | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शड्डू, नांदेडचं चित्र काय?

नांदेड जिल्ह्यात 1014 ग्राम पंचायतींसाठी निवडणूक होणार असून सर्व ग्राम पंचायतीतील सदस्य संख्या 8624 आहे

Gram Panchayat Election | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शड्डू, नांदेडचं चित्र काय?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM

नांदेड : जिल्ह्यातील 1014 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Nanded Gram Panchayat Election) आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. नांदेडमध्ये एकूण 3 हजार 237 जागांसाठी निवडणूक असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळेल. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जिल्ह्यात भाजपने शड्डू ठोकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा काही प्रमाणात वाढवल्याने उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच खर्चाच्या तपशिलासाठी सहकारी बँकेतही खाते उघडता येणार आहे. (Nanded Gram Panchayat Election BJP vs Congress Updates)

 येळेगावात काँग्रेसला विरोधी गटाची टक्कर

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील येळेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. 13 सदस्यांसाठी इथे निवडणूक होणार आहे. येळेगाववर आजपर्यंत काँग्रेसचे प्राबल्य राहिलं आहे. यंदा मात्र विरोधी गटाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे येळेगावमध्ये निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगला आहे.

पांढरवाडीत प्रत्येक वार्डात स्वतंत्र तयारी

सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी गावातील निवडणुकीत निरुत्साह जाणवत आहे. सात सदस्य संख्या असलेल्या पांढरवाडी गावच्या निवडणुकीसाठी पॅनल ठरत नसल्याने गाव पुढारी हतबल झाले आहेत. मात्र प्रत्येक वार्डातून उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत आहेत.

पाटनूरमध्ये काँग्रेसला सत्ता राखण्याचं आव्हान

अर्धापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीवर काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे. मात्र आता भाजपनेही आपले पॅनल निवडणुकीत उतरवले आहेत. राजकीयदृष्ट्या महत्वाचे गाव असलेल्या पाटनूर ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्य संख्या आहे. यावेळेलाही पाटनूरमध्ये काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास ग्रामस्थ बोलून दाखवतात. त्यामुळे पाटनूर गावाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले लहान गाव

अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लहान गावात आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पाच वर्षांपूर्वी बिनविरोधपणे ग्रामपंचायत निवडून देत लहान गावाने आदर्श घालून दिला होता. यावेळी मात्र निवडणूक लढवण्यासाठी गावपुढाऱ्यांनी जय्यत तयारी केली. लहान गावावर कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे, मात्र आता गावात गटातटाचे राजकारण वाढल्याने काँग्रेसला आव्हान निर्माण झालं आहे.

35 वर्षांपासून बिनविरोध सरपंचाची परंपरा कायम

सरपंचपदाचे आरक्षण सदस्यांच्या निवडीनंतर होईल असे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका गावाने बिनविरोधपणे आपल्या सरपंचाची निवड ठरवून घोषित देखील केली. कंधार तालुक्यातील भोजुची वाडी या गावाने सतीश देवकते या युवकाकडे सरपंच पद सोपवलं आहे. गेल्या 35 वर्षांपासून या गावात बिनविरोधपणे ग्रामपंचायत निवडून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा या गावाने या वेळेला जपली. गावात दोनच समाज राहत असल्याने सरपंचपदाचे आरक्षण स्त्रीला सुटले तर सतीशच्याच घराला हा मान देईल असेही ठरलं आहे. या गावाने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावकऱ्यांचे कौतुक केलं आहे. (Nanded Gram Panchayat Election BJP vs Congress Updates)

नांदेड जिल्ह्यात एकूण 1309 ग्रामपंचायत आहेत त्यापैकी 

जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या एकूण ग्राम पंचायती – 1014

सर्व ग्राम पंचायतीतील एकूण सदस्य संख्या – 8624

7 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 480

9 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 397

11 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 85

13 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 24

15 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 16

17 सदस्य असलेल्या एकूण ग्रा.पंचायती – 12

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक, इंजिन पुन्हा रुळावर येणार?

(Nanded Gram Panchayat Election BJP vs Congress Updates)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.