40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला, नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप

नांदेडमधील मरळक गावात बापूराव शिंदे यांच्या निधनामुळे मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला, नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:09 PM

नांदेड : नांदेड तालुक्यातील मरळक ग्रामपंचायत Nanded Maralak Gram Panchayat Election Updates निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. जागृत महादेवाचे मंदिर असल्याने मरळक गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. महादेव मंदिरामुळे सबंध जिल्ह्यात मरळक गावाची ओळख आहे. 40 वर्ष सत्ता राखणाऱ्या नेत्याच्या निधनानंतर या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन गट आमनेसामने आल्याने चर्चा रंगली आहे. (Nanded Maralak Gram Panchayat Election Updates)

मरळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या अनेकांचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे . या गावाची लोकसंख्या 6000 असून गावात 2500 मतदार आहेत. गावातील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे. मरळक ग्रामपंचायत पूर्वी भाजपच्या ताब्यात होती.

बापूराव शिंदेंच्या निधनानंतर राजकीय पोकळी

गावातील बापूराव शिंदे यांच्या गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून शिंदे यांचा शब्द हा गावासाठी प्रमाण होता. मात्र गेल्या वर्षी बापूराव शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे गावात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

बापूराव शिंदेंच्या निधनामुळे मरळक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एक जुना भाजप गट आणि एक नवखा भाजप गट अशा दोन्ही गटांनी आपापली कंबर कसली आहे. गावात ताकदवान असलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या जुन्या गटासोबत आहेत.

भाजपच्या नव्या गटासोबत शिवसेना-काँग्रेस 

दुसरीकडे, शिवसेना आणि काँग्रेस भाजपच्या दुसऱ्या गटासोबत असल्याने भाजप विरुद्ध भाजप अशीच लढत या गावात राहणार आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या-जुन्या पुढाऱ्यात या गावात सामना रंगणार आहे. त्यामुळे मरळक ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. (Nanded Maralak Gram Panchayat Election Updates)

सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.

दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे. गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे. या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे. त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शड्डू, नांदेडचं चित्र काय?

(Nanded Maralak Gram Panchayat Election Updates)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.