Nanded | Sanjay Biyani यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय, हत्येचा तपास वेगाने करू, Ashok Chavan यांचं आश्वासन

नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हे मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर निघत होते. एवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी आणि त्यांचे कार चालक गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

Nanded | Sanjay Biyani यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय, हत्येचा तपास वेगाने करू, Ashok Chavan यांचं आश्वासन
संजय बियाणी यांच्यावर गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 3:45 PM

 नांदेड| शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचा संपूर्ण नांदेडमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज गोवर्धन घाट इथल्या स्मशानभूमीत संजय बियाणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. गरीबांना, गरजूंना स्वस्तात घरे बांधून देणारे बिल्डर अशी त्यांची नांदेडमध्ये ख्याती होती. मंगळवारी त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून त्यांची हत्या (Nanded Murder) घडवून आणली. त्यामुळे अवघं नांदेड हादरलं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाभरातून त्यांच्या चाहत्यांनी अंत्यविधीच्या वेळेला मोठी गर्दी केली होती. बियाणी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेदेखील यावेळी उपस्थित होते. संजय बियाणी यांच्यासारख्या मेहनती व्यावसायिकाची हत्या होणं ही नांदेडसाठी अतिशय दुःखदायक आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी बाब आहे, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. तसेच या प्रकरण वेगाने तपासून करून दोषींवर कारवाई केली जाईल, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेड एकवटला

नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर यांची मंगळवारी भर दिवसा हत्या झाल्यानंतर अवघ्या नांदेडमध्ये दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. खंडणीखोरांनी ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच संजय बियाणी यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी दोषी असलेल्यांना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक आणि सामान्य जनतेतून होत आहे. संजय बियाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्यांची अंत्ययात्रा रोखण्यात आली, तसेच घोषणाबाजी करून पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी वेगाने तपास करू, असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सदर अंत्ययात्रा मार्गस्थ झाली. गोवर्धन घाट येथील स्माशानभूमीवर संजय बियाणी यांच्या पार्थिवाला निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय एकटवटला होता.

काय घडली नेमकी घटना?

नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हे मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर निघत होते. एवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी आणि त्यांचे कार चालक गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांचा मंगळवारी मृत्यू झाला.  या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गुंडांनी अगदी बेदरकारपणे जवळ जाऊन त्यांची हत्या केल्याचे दिसून आले. नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात फ्लॅट उपलब्ध करून देणारे म्हणून संजय बियाणी लोकप्रिय होते. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्त घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी त्यांना धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्ष देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी ती काढून घेण्यात आली होती.

इतर बातम्या-

Latur Market : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, शेतकरी करणार का संधीच सोनं…!

Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.