Nanded | नांदेडच्या कहाळा परिसरात जळालेली दुचाकी , संजय बियाणींच्या हत्येसाठी हिचाच वापर केला का?
तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणताही महत्त्वाचा क्लू पोलिसांच्या हाती आलेला नाही.
नांदेड : प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येसाठी जी दुचाकी वापरण्यात आली होती, त्यासारखीच दिसणारी एक दुचाकी नांदेडमध्ये जळीत (Burned Bike) अवस्थेत आढळली आहे. त्यामुळे बियाणींच्या हत्येसाठी वापरलेली बाइक जाळून पुरावा नष्ट केला की काय असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 8 एप्रिल रोजी नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या (Murder case) करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्या जवळ जाऊन चार गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेला आठ ते नऊ दिवस उलटले असूनही पोलिसांना अद्याप महत्त्वाचा क्लू सापडलेला नाही.
हीच ती दुचाकी का ?
संजय बियाणी यांच्या हत्येला आठ दिवस उलटल्यानंतर कहाळा परिसरात ही जळालेली दुचाकी सापडली आहे. विशेष म्हणजे नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यापासून दूर अंतरावर ही जाळलेली दुचाकी आढळून आलीय. त्यामुळे या प्रकरणात संशय बळावला असून पोलीस या घटनेचा तपास करतायत.
बियाणींच्या हत्येचे गूढ कायम
नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 8 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. गरीबांना कमी किंमतीत फ्लॅट उपलब्ध करून देणारे अशी त्यांची ख्याती आहे. काही वर्षांपूर्वी खंडणीखोरांचे त्यांना धमक्यांसाठी फोनही येत होते. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणताही महत्त्वाचा क्लू पोलिसांच्या हाती आलेला नाही.
इतर बातम्या-