AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded VIDEO | भूगोल, इतिहास असो कायद्याचा प्रश्न विचारा, नांदेडचा 3 वर्षाचा अभिनंदन बघा कसा खाड् खाड् उत्तरं देतोय!

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital), उपराजधानी, महत्त्वाची शहरं आदी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर तो देतोच. पण विधानसभा, राज्यसभेतील सदस्यांची संख्याही त्याला तोंडपाठ आहेत.

Nanded VIDEO |  भूगोल, इतिहास असो कायद्याचा प्रश्न विचारा, नांदेडचा 3 वर्षाचा अभिनंदन बघा कसा खाड् खाड् उत्तरं देतोय!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 5:55 PM

नांदेडः सामान्य ज्ञानाच्या (General Knowledge) प्रश्नांची बरसात व्हावी आणि एखाद्यानं ताड ताड फटाक्यांची लड वाजावी, तशी उत्तरं द्यावी. तेही उत्तरं देणारा मुलगा अगदीच लहान असेल तर ऐकणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांचीही बोलती बंद होईल. नांदेडमध्ये (Nanded) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.  अभिनंदन सचिन रहाटकर या तीन वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून शेअर केला जातोय. सचिनची आई त्याला एकानंतर एक असे प्रश्न विचारत जाते आणि सचिन क्षणाचाही विलंब न लावता त्याची उत्तर देतोय. महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital), उपराजधानी, महत्त्वाची शहरं आदी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर तो देतोच. पण विधानसभा, राज्यसभेतील सदस्यांची संख्याही त्याला तोंडपाठ आहेत.

अचाट बुद्धिमत्तेचं कौतुक

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील तीन वर्षांच्या अभिनंदन सचिन रहाटकर या मुलाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लहान असल्यामुळे अभिनंदनचे उच्चार फारसे स्पष्ट नाहीत, पण आईनं विचारलेल्या प्रश्न खाली पडू न देता तो खाड खाड उत्तर देतोय.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नांदेडच्या चिमुरड्याची अचाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती पाहून भल्या भल्यांना आश्चर्य वाटत आहे. सचिनचा व्हिडिओ सध्या नांदेड आणि परिसरात तुफान व्हायरल होतोय. त्याच्या बुद्धिमत्तेचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.