Narayan Rane | दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Narayan Rane | दादागिरी केली तर 'मातोश्री'च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 5:06 PM

मुंबई : “माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने, शैलीने, विचाराने (Narayan Rane Attacked Cm Uddhav Thackeray) आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत”, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Narayan Rane Attacked Cm Uddhav Thackeray)

“राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?”, असा सवालही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.

LIVE 

[svt-event title=”शिवसेना-आमदार खासदारांना कोणीही विचारत नाहीत – नारायण राणे” date=”26/10/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना-आमदार खासदारांना कोणीही विचारत नाहीत, पुढच्या वेळी 15 आमदारही निवडून येणार नाहीत, घराबाहेर पडून अभ्यास करा, सोलापूरला जाऊन तीन हजार आठशेचे आठ चेक दिले, काय होणार? : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”तुमच्यासारख्या माझ्या अनेक केसेस पेडिंग नाहीत – नारायण राणे” date=”26/10/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ] त्यांना काय माझ्या चौकशा करायच्या त्या करा. तुमच्यासारख्या माझ्या अनेक केसेस पेडिंग नाहीत. त्या कुठे पेंडिंग आहेत त्या एक ना एक दिवस काढेल. [/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे – नारायण राणे” date=”26/10/2020,4:26PM” class=”svt-cd-green” ] बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा? – नारायण राणे ” date=”26/10/2020,4:20PM” class=”svt-cd-green” ] शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा? निषेध करतो, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल, मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या काळात पिंजऱ्यात बसून, मुख्यमंत्री घरात बसून? – नारायण राणे” date=”26/10/2020,4:17PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या काळात पिंजऱ्यात बसून, मुख्यमंत्री घरात बसून? कोणी सांगितलं वाघात आहात? पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे? मी शिवसेनेत ३९ वर्ष होतो, बाळासाहेबांनी मला पदं दिली, बेडूक म्हणून नाही, तर वाघ म्हणून : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं – नारायण राणे” date=”26/10/2020,4:15PM” class=”svt-cd-green” ] सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”हिंदुत्वावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही- नारायण राणे” date=”26/10/2020,4:12PM” class=”svt-cd-green” ] हिंदुत्वावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, युती करुन ५६ आमदार निवडून आले ते नरेंद्र मोदींच्या नावावर, नाहीतर २५ आमदारही आले नसते, सेक्युलर पक्षाशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही – नारायण राणे ” date=”26/10/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही, त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत : नारायण राणे [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले – नारायण राणे ” date=”26/10/2020,4:06PM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का? [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या भाषणात शिवराळ बडबड, अर्थव्यवस्था, कोरोना यांचा उल्लेखही नाही – नारायण राणे” date=”26/10/2020,4:05PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा राखली, उद्धव ठाकरेंचं भाषण अपवाद ठरले, दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड, अर्थव्यवस्था, कोरोना यांचा उल्लेखही नाही : नारायण राणे [/svt-event]

Narayan Rane Attacked Cm Uddhav Thackeray

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील संपूर्ण मुद्दे

“आजची पत्रकार परिषद दसऱ्याच्या निमित्ताने 47 शिवसैनिकांमध्ये झालेल्या भव्य सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं, त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद”.

“माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवले. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाषण आहे. त्यांच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले आहेत”.

“त्यांनी राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख नाही. ना शेतकऱ्याचा उल्लेख ना, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले नाही. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?”, असा सवाल राणेनी मुख्यमंत्र्यांना केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नाही – नारायण राणे

“शिक्षणाची दुरावस्था आहे, या मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे. आपण मुख्यमंत्री आहोत. कोणाबद्दल कसं बोलावं इतकंही त्यांना माहिती नाही. त्यांची लहानपणापासून मला माहिती. ते मुख्यमंत्रीपदाच्या लायकच नाही”, असंही ते म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचं सांगितलं. कुठं आहे ती गुंतवणूक कोठे आहे, फक्त कागदावर आहे. मी उद्योगमंत्री असताना 30 हजार कोटी रुपये उभे केले आणि कंपन्या सुरु केल्या. यांच्या कंपन्या कुठे आहेत? रोजगार कुठे आहेत?”, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

“यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. यांनी बेमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. यांनी 56 आमदारांसाठी बेमानी केली.” (Narayan Rane Attacked Cm Uddhav Thackeray)

सुशांतची आत्महत्या नाही, तो खून, आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल – नारायण राणे

“उद्धव ठाकरे यांनी सीबीआयबद्दल स्वतःच आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली”, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं.

“कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते आत्ता कुठे एका दौऱ्याला बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल.”

बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी छळलं – नारायण राणे

“बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी छळलं आहे. 2005-06 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना भवनसमोर गडकरी चौकात घ्यावं असं वाटत होतं. त्यांनी सर्व नेत्यांसमोर तसं सांगितलं. मी त्यांच्याविषयी अशा घटना सांगितल्या तर मुख्यमंत्रीपद सोडून पळतील हे”, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

“त्यांना काय माझ्या चौकशा करायच्या त्या करा. तुमच्यासारख्या माझ्या अनेक केसेस पेडिंग नाहीत. त्या कुठे पेंडिंग आहेत त्या एक ना एक दिवस काढेल.”

“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं न ऐकता आपल्या वाढदिवसाला 27 जुलै 2006 रोजी नव्या शिवसेना भवनाचं उद्धाटन केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याला उद्घाटन करण्यास सांगितलं होतं. वडिलांचं नाव सांगतात. वाघ म्हणवून घेतात, कुणाच्या कानफडात तरी मारली का? केसेस आम्ही अंगावर घेतल्यात.”

बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून शांत – नारायण राणे

“त्यांनी रावसाहेब दानवेंचे वडिल काढले. तुम्ही मुख्यमंत्री आहात ना? ते म्हणे शेण आणि गोमूत्र पितात. यांनी रेशनवर धान्य सोडून गोमूत्र आणि शेण देणं सुरु केलं का आपल्या राजवटीत? मी या गोष्टीचा निषेध करतो. अशी भाषा असू नये.”

“त्यांनी ही भाषा सोडली नाही आणि आमचा तोल गेला तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची जी माहिती देऊ ती महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल.”

“कुणाला दादागिरीची भाषा, कुणाला वाघाची भाषा ? शेळपट आहेत. मराठी माणसासाठी शिवसेना म्हणतात, मुख्यमंत्री झाल्यावर काय केलं यांनी. नोकऱ्यांचा प्रश्न आहे. मोदींना सांगतात हे करुन दाखवा म्हणून. मोदींनी जे केलं त्याच्या काही अंश देखील उद्धव ठाकरेंना करता आलं नाही. मोदींनी कलम 370 हटवलं यांनी बेळगाव कारवार प्रश्न सोडवून दाखवावा. मग पाकव्याप्त प्रदेश वगैरे नंतर बोलू.”

“एकही काम यांनी केलं नाही. कर्जमाफी, यांच्याकडे पैसे तरी आहे का? यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. माझे सर्व शब्द त्यांना सांगा.”

“दसरा मेळाव्यातील भाषण केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी होतं. हे मुख्यमंत्री थापाबाज आणि दिशाभूल करणारा आहे. हे मराठा आरक्षण कधीही देणार नाही, ते मराठ्यांचा द्वेष करणारे आहेत. मी मराठ्यांना आरक्षण घेऊन दिलं. त्यांनी निर्णय घेऊन दाखवावं. त्यांना कायदा माहिती नाही, घटना माहिती नाही. ते फक्त बोलायचे म्हणून बोलतात”, असंही ते म्हणाले.

संजय राऊत विदुषक – नारायण राणे

“संजय राऊत सामनात म्हणतात आम्ही 5 वर्षे पूर्ण करणार, मात्र यांच्याकडे आमदार किती आहेत? संजय राऊत विदुषक आहे. शिवसेना 25 वर्ष सत्तेत म्हणतात. हे कोणत्या नशेत आहेत? शिवसैनिकांची कामं होत नाही. शिवसेनेच्या आमदार खासदारांना कुणी विचारत नाही. शिवसेनेत असंतोष आहे. पुढीलवेळी 25 आमदारही निवडून येणार नाहीत. त्यामुळे हतबल होऊन त्यांनी दसऱ्याला भाषण केलं. त्यांनी आपलं केलेलं काम सांगावं”.

“सिंधूदुर्गला 144 कोटी मिळायचे आता यांनी 42 कोटी पाठवले त्यात 21 कोटी कोरोनासाठी आणि 21 कोटी विकासासाठी. हे म्हणतात यांचे कोकणावर प्रेम आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ते पुन्हा आमच्या पंतप्रधान आणि भाजप नेत्यांना काही बोललं तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.”

“हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत. ते तरी दुसऱ्याच्या हाताने नाचतात, यांना नाचताही येत नाही. त्यांचं दसऱ्याचं भाषण महाराष्ट्राचं अधोपतन करणारं आहे.” (Narayan Rane Attacked Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या :

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल

पंतप्रधान मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही; नारायण राणेंचा घणाघात

बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

आमच्याकडे नजर फिरवू नका, नाहीतर पळता भुई थोडी होईल : नारायण राणे

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.