संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे.

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे
राऊतांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर-राणे
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:16 PM

मुंबई : संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफा डागल्यानंतर भाजप (Bjp) नेत्यांनी आता राऊतांविरोधात रान उटवलं आहे. कालपासून अनेक नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच राऊतांना अनेक सवालही केले आहेत. आता एवढं राजकारण तापलं असताना. नारायण राणे (Narayan Rane) कसे गप्प बसतील. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.

आरोपांचे पुरावे द्या-राणे

तसेच राऊतांच्या आरोपावर बोलताना, पत्रकार आहेस, दे पुरावा, तुझी जमीन, 50 एकर 50 लाखात घेतली, बरं ते पैसे आणलेस कुठून, बरं हा सुजीत पाटकर कोण, त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात, स्वत आधी उत्तरं दे, असे म्हणत राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे, हा अर्धा नाही पूर्ण राष्ट्रवादीचा आहे, जेव्हा उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले, तेव्हा संजय राऊतच होते. तुझी कुंडली माझ्याकडे आहे, सगळी बाहेर काढून टाकेल, केलेल्या केसेसबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल मला सगळं माहितीय, राऊतांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसू नये, थोडी पुजा करावी, हे करायला पाहिजे हो, त्याशिवाय तोंड गप्प नाही होणार, असा इशाराही राणेंनी दिला आहे.

राऊत बाळासाहेबांबद्दल घाणेरडे बोलले-राणे

तसेच बाळासाहेबांबद्दल बोललेलं मी कधी ऐकून नाही घेतलं, एवढा घाणेरडं बोललेलं आहे, हा कसा झोळी घेऊन फिरायचा, मी पाहिलाय. का रे बाबा तुझा प्रवीण राऊतशी संबंध काय? असा सवाल राणेंनी केलाय. अजून बरंच यायचंय. पगारी नेता आहेस तू, फूकट नाही, ओव्हर टाईम करुन कमवतो, प्रवीणच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत हे कळल्यावर राऊत घाबरले. त्यामुळे त्यांचा थयथयाट झाला आहे. अशी घणाघाती टीका आज नारायण राणेंनी केली आहे. त्यामुळे राजकारणात चांगलीच फोडणी पडली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.