PM Modi In Pune: पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते आज (6 मार्च) पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते आज (6 मार्च) पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. हा उद्धाटन समारंभ गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरुड) पर्यंत होणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी दोन पर्यंत कर्वे रस्ता आणि पौड रस्ता बंद असणार आहे. नरेंद्र मोदीच्या दौ-यात पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणार आहे. पुण्यात नरेंद्र ज्या ठिकाणी जाणार आहेत, तिथल्या परिसरात पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), अजित पवार आणि सुभाष देसाई हे महाविकास आघाडीतील नेते पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना जास्त प्रवास करता येत नसल्याने मुख्यमंत्री उपस्थित नसल्याचे सागण्यात आले आहे. खरं सांगायचं तर पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार असून पंतप्रधान पाच तासात पुण्यातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत, त्याचबरोबर तिथल्या अनेक कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
PM Modi to launch Pune metro rail project today
Read @ANI Story | https://t.co/w8N7PUFNlC#PMModi #PuneMetro #Pune pic.twitter.com/987Ney6dS2
— ANI Digital (@ani_digital) March 6, 2022
मोदींचं मिशन पुणे..
- मोदी आज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत पुण्यात
- सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन
- सकाळी 11 वाजता पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण
- सकाळी 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन, गरवारे स्टेशन (पंतप्रधान मेट्रोने प्रवास करणार)
- 12 वाजता एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन, त्यानंतर जाहीर सभा
- 1.45 वाजता, सिम्बाय़सिस, आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन
- 3 वाजता पुण्याहून रवाना होणार
ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन ते दीड वाजता करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील अशी माहिती प्राथमिक माहिती आहे. मोदी पुण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. तसेच आजच्या होणा-या कार्यक्रमांना महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याची देखील चर्चा पुण्यात आहे. त्याचबरोबर आज पुण्यात नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याकडे सुध्दा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.