नरेंद्र पाटलांकडून अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना, मराठा आरक्षणाचा लढा लढणार

मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. (Narendra patil annasaheb patil vikas foundation)

नरेंद्र पाटलांकडून अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना, मराठा आरक्षणाचा लढा लढणार
नरेंद्र पाटील
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 3:53 PM

सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे गुरुवारी (21 जानेवारी) उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. (Narendra Patil formed Annasaheb Patil vikas foundation)

राजकारण नव्हे तर सामान्यांसाठी लढणारं फाऊंडेशन

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे, संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे असे तिन्ही राजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

संचालक मंडळ बऱखास्त झाल्याने नरेंद्र पाटील नाराज

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यांनतर नरेंद्र पाटलांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. “अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ सरकारने बरखास्त केले त्याबद्दल मला वाईट वाटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो,” असे नरेंद्र पाटील म्हणाले होते.

वडेट्टीवारांना काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार :  सकल मराठा समाज

बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याचा मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे.या घोषणेची अधिकृत माहिती सचिन तोडकर यांनी आज (26 जानेवारी) दिली दिली. तसेच, समस्त मराठा समाजाने वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहनही त्यांनी केले. सकल मराठा समाजाच्या या घोषणेनंतर वडेट्टीवार यांना अद्याप अधिकृत प्रतक्रिया दिलेली नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं.  या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या चेहऱ्याला जो कोणी काळ फासेल त्या व्यक्तीचा कोल्हापुरातील मराठा समाज, मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर  सत्कार करेल असं सांगितल.

संबंधित बातम्या :

अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक मंडळ बरखास्त केल्याचं वाईट वाटलं; नरेंद्र पाटील नाराज

… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

(Narendra patil formed annasaheb patil vikas foundation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.