AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narvekar on Nitesh Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांचे खोचक ट्विट, झणझणीत वाक्याने भाजप कार्यकर्ते खवळले!

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. मात्र, दुसरीकडे याप्रकरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक खोचक ट्विट करत झणझणीत उत्तर दिले आहे.

Narvekar on Nitesh Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांचे खोचक ट्विट, झणझणीत वाक्याने भाजप कार्यकर्ते खवळले!
नितेश राणे आणि मिलिंद नार्वेकर.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 2:06 PM

मुंबईः संतोष परब हल्ला प्रकरणी (santosh parab) भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांना सर्वोच्च न्यायालयातही (suprem court) दिलासा मिळाला नाही. त्यांनी येत्या दहा दिवसांत न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, दुसरीकडे याप्रकरणी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक खोचक ट्विट करत झणझणीत उत्तर दिले आहे.

काय म्हणतात नार्वेकर?

नितेश राणे याचा जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केले आहे. त्यात फक्त एका वाक्यात झणझणीत प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. नार्वेकरांच्या या ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावर एका नेटकऱ्याने मातोश्रीचा घरगडी म्हणत टीका केलीय. तर दुसऱ्याने घरगडी जरी असला तर प्रामाणिक आहेत. तुझा साहेब दर वर्षी नवीन पक्षात. आता 2024 ला तृणमूल की द्रमुक, असा सवाल केला आहे. तर एकाने सत्तेचा गैरवापर करून सरकारी पैशाने मोठे वकील देऊन नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितेश राणे लाचारांना पुरून उरतील. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नगरपंचायतमध्ये भकास आघाडीला धूळ चारली. आता मुंबई महापालिकेतहीलाचार सेनेची हार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप केलाय.

पुढे काय होणार?

पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे, असे राणेंचे वकील देसाई यांनी सांगितले, पण कोर्टाने ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे, असं देसाई म्हणाले. अटकपूर्व जामीन म्हणजे अटक होण्याच्या अगोदर किंवा अटक झाल्या झाल्या सीआरपीसी 438 नुसार अर्ज करता येतो. रेग्युलर जामीन म्हणजे अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. त्यामुळे सेशन कोर्टात जाऊन आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. फरक फक्त एवढाच की आम्ही स्वत:हून गेलो असलो तरी आम्हाला अटक झालेली नसेल. आम्ही पोलिसांच्या कस्टडीत नसू. त्यामुळे आम्हाला दहा दिवसांचं संरक्षण आहे, असेही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.