नाशिकः नाशिक शहरातून एक अपघाताची बातमी हाती आली आहे. आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला वीजेचा जबरदस्त शॉक (Electric Shock) लागला. त्यामुळे या तरुणााचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झाडा शेजारून गेलेल्या वीजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) होता. आंबे (Mango) तोडण्यासाठी तो शिडीच्या मदतीने झाडावर चढला होता. त्याच्या हातात लोखंडी पाईप होता. हा पाईल वीजेच्या तारांना लागल्यामुळे तरुणाला जोरदार धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत त्याला जीवानिशी मुकावं लागलं.
वीजेचा शॉक लागल्याची ही घटना नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरात घडली. या कॉलनीतील राजसारथी सोसायटीतील आंब्याच्या झाडावर सदर तरुण चढला होता. मात्र शेजारून वीजेची तार गेली होती. हातातील लोखंडी पाईपने आंबे पाडत असताना त्याचा पाइप वीजेच्या तारांना लागला. यामुळे वीजेचा धक्का लागून त्याला शॉक बसला. या घटनेत अनिरुद्ध धुमाळ या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. घटनेनंतर इंदिरानगर परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, अनिरुद्ध धुमाळ हा घरातील झाडावरील आंबे तोडण्यासाठी शिडीच्या सहाय्याने आंब्याच्या झाडावर चढला. तेव्हा त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या वीजेच्या तारांना झाला. त्यामुळे त्याला जोरदार वीजेचा शॉक बसला. वीजेच्या धक्क्यामुळे तो झाडावरून खाली फेकला गेला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.