Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत.

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे...राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 9:23 AM

नाशिकः नाशिककरांच्या ह्रद्याचा ठोका चुकवणारी बातमी. आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, असा इशारा वाढते कोरोना रुग्ण पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांना महापालिकेला पाठविलेल्या पत्रात दिल्या आहे. त्यामुळे प्रशासन दक्ष झाले आहे. शहरात तब्बल 8 हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना नियमांची सातत्याने पायमल्ली सुरू असल्याने रुग्णांमध्ये कितीतरी झपाट्याने वाढ होत आहे.

काय आहे इशारा?

ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात 13 लाख 63 हजार नागरिकांपैकी 12 लाख 64 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे. यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शाळांबाबत आज निर्णय

नाशिकमध्ये झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण पाहता आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होत आहे. या बैठकीत शहरातील शाळा आणि कॉलेज सुरू ठेवायचे की बंद करायचे, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य सचिवांनी दिलेला इशारा आणि गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू झालेला रुग्णांचा गुणाकार पाहता, या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. सध्या मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा निर्णय नाशिकबाबतही होऊ शकतो. कारण नाशिकच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

8 हजार खाटा सज्ज

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

इतर बातम्याः

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Nashik| नाशिकमध्ये घरपट्टी माफ होणे तूर्तास अशक्य, घोडे कुठे आडले?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.